आज दिनांक 19 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. एकीकडे राज्यात वेदांतावरून वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. तसेच आज राज्याच्या विविध जिल्ह्यातील 547 ग्रामपंचायतींचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीचं महत्त्वाचं वैशिष्ट म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर पहिल्यांदाच सरपंचपदाची निवड थेट जनतेमधून होणार असल्याने, या ग्रामपंचायत निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निकालांकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. पुणे, नाशिक, नांदेड, धुळे, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, या जिल्ह्यांसह एकूण 16 जिल्ह्यांमधील ग्रामपचायत निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे.
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या T20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर आज पहिला सामना झाला. टीम इंडियाने या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेवर 8 विकेट राखून सहज विजय मिळवला. तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
खासदार शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून शशी थरूर यांना निवडणूक लढविण्यास ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. या निमित्ताने तब्बल 22 वर्षांनंतर काँग्रेसला निवडलेला अध्यक्ष मिळणार आहे.
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँगेस आणि काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ग्रामपंचायती मिळवल्या असल्याचा दावा आता राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुक ही चिन्हावर लढवली जात नाही. त्यामुळे असा कुणी दावा करत असेल तर ते चुकीचे आहे असा टोला जयंत पाटील यांना भाजपा आणि शिंदे गटाला लगावला आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाचं नंबर वन आली आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजपालाच कौल दिल्याचे ट्विट भाजप नेते केशव उपाध्याय यांनी केले आहे. भाजपा २७४, शिवसेना(शिंदे) ४१, उध्दव ठाकरे गट १२, काँग्रेस ३७ तर राष्ट्रवादीने ६२ ठिकाणी विजय मिळवला आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाचं नं १. महाराष्ट्रातील जनतेचा भाजपालाच कौल
भाजपा २७४
शिवसेना(शिंदे) ४१
उध्दव ठाकरे गट १२
काँग्रेस ३७
राष्ट्रवादी ६२— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 19, 2022
पाकिस्तान देशात सध्या महापुराच मोठ संकट आहे. WHO ने याबबात चिंता व्यक्त केली आहे. महापुराच्या संकटानंतर संपूर्ण पाकिस्तानात रोगराईचं संकट ओढावू शकते. संसर्गजन्य रोग अतिशय वेगाने संक्रमित होण्याची चिंता WHO ने व्यक्त केली आहे. पाकिस्तान देशाने योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन WHO ने केले आहे.
भोरमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेस आमदार संग्राम थोपटेना धक्का
भोर तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा
तालुक्यातील भोलावडे आणि किवत या दोन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व
एकूण ग्रामपंचायत- 82
शिवसेना – 02
शिंदे गट – 00
भाजप – 03
राष्ट्रवादी – 17
काँग्रेस – 01
माकप – 03
इतर -01
अमरावती जिल्ह्यातील पाचही ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर
पाच ग्रामपंचायतमध्ये तीन काँग्रेस एक प्रहार व एका ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा
उंबरखेड ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी काँग्रेसचे नितीन कळंबे विजयी
घोटा ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी काँग्रेसच्या रुपाली राऊत विजयी
कवाडगव्हाणमध्ये सरपंचपदी काँग्रेसच्या मोहीनी चौधरी विजयी
चांदूरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी भाजपच्या वर्षा माताडे विजयी
हरिसाल ग्रामपंचायतीमध्ये प्रहारचे विजय रामेश्वर दारशिंबे विजयी
अमरावती जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादी व शिंदे गटाला एकही जागा नाही
नंदूरबार जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल
एकुण ग्रामपंचायती – 149
शिवसेना – 0
शिंदे गट – 6
भाजप- 24
राष्ट्रवादी- 0
काँग्रेस- 5
स्थानिक विकास आघाडी – 3
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल
एकुण ग्रामपंचायत- 16
शिवसेना – 2
शिंदे गट – ००
भाजप- 1
राष्ट्रवादी- 3
काँग्रेस- 1
इतर-००
जळगाव ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेट
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसनं खातं उघडलं,
सत्रासेन ग्रामपंचायतीच्या 11 पैकी 10 जागा आणि सरपंच पदावर बाजी
शिवसेनेनंही खातं उघडलं, बोरमळी-देव्हारी ग्रुपग्रामपंचायतीत शिवसेनेचा सरपंच
आतापार्यंतच्या निकालात भाजप सर्वात मोठा पक्ष
शिवसेनेकडे सर्वात कमी ग्रामपंचायती
भाजप 27 शिंदे गट 5 शिवसेना 4 काँग्रेस 8 राष्ट्रवादी 19 इतर 10
अकोले ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सरुवात
41 सरपंचपदासाठी 175 उमेदवार रिंगणात
4 ग्रामपंचायत बिनविरोध
सावरकुटे, शेलद, जामगाव , खुंटेवाडी या ग्रामपंचयात बिनविरोध
संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपणार
संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
संजय राऊतांना मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर केले जाणार
संजय राऊतांच्या जामिनाला ईडीचा विरोध
शिंदे गटाचा पुन्हा ठाकरे गटाला धक्का
खा. हेमंत गोडसे, भाऊलाल तांबडे यांचा शिंदे गटात प्रवेश
शिंदे गटाकडून नाशकात देखील नियुक्त्या सुरू
नियुक्त्या सुरू केल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली
लम्पीचे देशभरात थैमान, 82 हजार जनावरांचा मृत्यू
राज्यात 187 जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू
उपाययोजनेसाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर आज लंडनमधल्या वेस्ट मिनस्टर हॉलमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या अंत्यसंस्कारासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष जो. बायडन आणि जगातल्या महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत या अंत्यसंस्कारासाठी 2000 मान्यवर उपस्थित राहणार असून, 6000 पेक्षा जास्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत.