मुंबई : आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यात गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सणोत्सवांवर बंधने आली. मात्र यंदा दोन वर्षानंतर सर्व निर्बंध हटवण्यात आल्याने, सर्वच उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत आहेत. आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने पुढील दहा दिवस आदिशक्तीचा जागर पहायला मिळणार आहे. राज्यात नवरात्रोत्सवाची जय्यात तयारी पहायला मिळत असून, यंदा कोल्हापूर, तुळजापूरमध्ये रेकॉर्ड ब्रेक भाविकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली आहे.
नवी दिल्ली
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची उद्या बैठक
संघटना सरचिटणीस केसी वेणूगोपाल आणि प्रदेश प्रभारी एच के पाटील यांनी उद्या बोलावली बैठक
मुंबई महापालिका निवडणूक आणि अन्य निवडणुका याच्यावर चर्चा होणार
सूत्रांची माहिती
20 हजार पोलिसांची भरती केली जाणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्रोत्सवाला जोरदार सुरुवात
माता सुरक्षित तर घर सुरक्षित हा कार्यक्रम ठाणे मनपाने राबवलाय.
पोलिसांच्या बाबतीत निर्णय तातडीने घेतला
परभणी
पाथरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आत्महत्या करावीशी वाटत असल्याचे स्टेटस ठेवून बेपत्ता,
वरिष्ठांनी अपमान केल्यामुळे आत्महत्या करावीशी वाटत असल्याचं स्टेटस,
पोलीस कर्मचाऱ्यांच्या शोधासाठी धावपळ
कोल्हापूर
देवस्थान समिती आणि जिल्हाधिकारी यांना कोर्टाची चपराक
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील इ पेड पास ला न्यायालयाची मनाई
देवस्थान समिती आणि जिल्हाधिकारी यांनी घेतलेला निर्णय कोर्टाने नाकारला
मुख्य दर्शन मार्ग सोडून व्हीआयपी दर्शन आणि ई पेड पास सुविधा देता येणार नाही – कोर्ट
सह दिवाणी न्यायाधीश सिंघेल यांचा आदेश.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य देताना सावधगिरी बाळगावे – कोर्ट
श्रीपूजक गजानन मूनिश्र्वर यांची याचिका कोर्टातर्फे मंजूर.
नाशिक
– नाशकात उद्या संध्याकाळी तर परवा अनेक भागांत पाणी नाही
– व्हॉल्व्ह दुरुस्तीच्या कामांमुळे असणार पाणीपुरवठा बंद
– मनपाची पत्रकाद्वारे माहिती
– पाणी जपून वापरण्याचे मनपाचे आवाहन
– पश्चिम भागात असणार पाणीपुरवठा बंद
जयंत पाटील
लोक बरोबर असल की प्रभाग कसलाही असला तरी फरक पडत नाही
आता तीन प्रभागाची कल्पना आहे
आताचे मुख्यमंत्री होते तेव्हा नगरविकास मंत्री होते चारचा प्रभाग करू म्हटले
आता तीनच प्रभाग केला आहे
काम काय केलं यावर लोक मदत करतात.
भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांना टार्गेट केलंय
त्यांशा राष्ट्रवादीची भिती वाटतीये
आम्ही एकसंघ करतोय
123 वरचा पक्ष 102 वर.आला तो 80 वर येऊ शकतो
फॉक्सकॉन प्रकल्प वेदातांबरोबर चर्चा करून
77 गुण पैकी 3 कमी मिळाले तळगावला भारतात
सगळ्या कंपन्याचं नेटवर्क आहे असली साईट कुठे नाही असं सांगितलं
आम्ही. दिल्लीत भेटलो
सरका गेलं तेव्हा त्यांनी पत्र पाठवलं
आम्ही एम ओ यू करायला या
काही हजार एकराची चर्चा करतो तेव्हा सर्हे
जिल्हाधिकाऱ्यांच पत्र असेल तर अपरिपक्व असेल
यांनीच लिहून घेतलं असेल
देशात न्यायव्यवस्था असेल तर आमचा विजय होईव
अपात्र होणं 10 व्या सुचीनुसार
न्याय द्यायचा नसेल तर लांबणीवर टाकणं हा पर्याय आहे
आमच्या त्यांच्यावर विश्वास आहे
कोण कोणाला भेटलं यावर कोण कुठे जाणार असं मला वाटत नाही
सुप्रीम कोर्टानं निर्णय. दिला तर 16 अपात्र होतील
त्यात सरकार कोसळेल कारण मुख्यमंत्री यात आहेत
एक पर्याय राष्ट्रपती राजवट किंवा मध्यावधी निवडणूका
अजित दादा बावनकुळेंशी बोलतात का ?.
त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचं बघावं
त्यांना मंत्रीपद दिलं नाही
कदाचित त्यांना वाटत असेल की सरकार बदलावं त्तात आपण बसतोय का बघावं
अजित पवार का नाराज होतील बावनकुळेंना टोला
तानाजी सावंत यांनी केलेलं वक्तव्य अतिशय गंभिर आहे
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या तोंडातून बोलतायेत असं आम्ही समजतोय
कारण त्यांचा आत्मविश्वास पाहता त्यांनी परवानगी दिली असं वाटतं
थोडक्यात काय मस्ती वाढली आहे
जयंत पाटलांचा तानाजी सावंतांना टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंतांवर घणाघाती टिका
थोडक्यात यांची मस्ती वाढली आहे
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या तोंडातून बोलतात असं आम्ही समजतो
यांचा बोलण्याचा आत्मविश्वास यांना बोलण्याची परवानगी आहे असं वाटतं
तानाजी सावंत यांनी केलेलं वक्तव्य अतिशय गंभीर आहे
राज्यातलं सरकार पडण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच संकेत
कोर्टात 16 आमदारांचा विषय प्रलंबित आहे हे 16 आमदार अपात्र झाले तर त्यात मुख्यमंत्री आहेत आणि सरकार पडेल
जर सरकार पडलं तर राष्ट्रपती राजवट किंवा निवडणूका होऊ शकतात …
भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांना टार्गेट केलंय
त्यांशा राष्ट्रवादीची भिती वाटतीये
आम्ही एकसंघ काम करतोय पुढच्या काळात आपल्या जागा कमी होऊ शकतात असं त्यांना वाटत असेल
123 वरचा पक्ष 102 वर आला तो 80 वर येऊ शकतो
त्यामुळे जास्तीत जास्त राष्ट्रवादीला टार्गेट केलं जातंय
जयंत पाटलांचा भाजपवर टिकास्त्र !
उरण
उरण समुद्रात संशयास्पद बोट सापडली
नंबरप्लेट नसलेली बोट सापडली
मस्तविभाग गस्त घालत असताना सापडली बोट
बोटीचा पाठलाग करून करंजा बंदरावर बोट आणून
उरण पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे
डिझेल चोरी साठी ही बोट वापरत असल्याचा पोलिसांचा संशय
उरण पोलीस घेत आहेत शोध
जयंत पाटील पत्रकार परिषद
सदस्य नोंदणीच काम सुरू आहे त्यासाठी कार्यकर्त्यांना भेटलो
सदस्य नोंदणीचा आढावा घेतलाय
सरकारचं धाडस होत नाहीये
सरकार निवडणूकांना घाबरतंय
लांबणीवर पडतंय
जनमत सरकारच्या विरोधात गेलंय आमची मागणी आहे निवडणूका लवकर घ्याव्यात
पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर येईल
अशी लोक संधीसाधू असतात सत्ता असलं की भलं होतं
अशी लोक संधी साधण्याचा प्रयत्न करत असतात
या शहरात भाजपात गोंधळाच वातावरण आहे
सत्ता नाही म्हटलं की येण्याचा प्रकार स्लो झालाय
निवडणूका जवळ आल्या की लोक येतील
बारामतीतला प्रश्न मला माहिती नाही
त्या गावामध्ये रस्त्यावरून वाद असेल खासदार गेल्यावर प्रश्न मांडला असेल
सोलापूरात पक्षात कोणता वाद असेल मला वाटत नाही
मी आणि अजित पवार त्यांना भेटणार आहे
पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा कार्यकर्ते देत असेल तर गंभीर आहे
भाजपाचं सरकार असताना असं होण गंभीर आहे
मात्र लोक धजावतात
इंटेलिजन्स नेटवर्क मजबूत असलं पाहिजे
यांचा कशावारच लक्ष नाही
सुप्रीम कोर्टाकडे यांच लक्ष आहे
कोल्हापूर राधाकृष्ण विखे पाटील
राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे जनावरांचा मृत्यू दर कमी ठेवण्यात यश आलय
रोगाचा प्रसार वेगाने होतो हे मान्य
आज सकाळपर्यंत आठशे पशुधनाचा मृत्यू झालाय
लसीकरणाच्या ड्राईव्ह मुळे प्रसार कमी व्हायला मदत झाली आहे
राजस्थान आणि पंजाबच्या तुलनेत पशुधनाची संख्या जास्त असतानाही रोगावर नियंत्रण आल यश आले
एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे सध्या मदत दिली आहे
लसीकरण,शंभर टक्के खर्च सध्या सरकार करते त्याचे मदत शेतकऱ्यांना झाली
कोल्हापूर जिल्ह्यात 93% लसीकरण झालय
On राजू शेट्टी
राजू शेट्टी यांनी एकदा वस्तुस्थिती सरकारकडून समजून घ्यावी
यावर राजकारण होऊ नये अशी आमची इच्छा आहे
त्यांच्या काही सूचना असतील तर त्यांनी कराव्यात
On तानाजी सावंत
सावंत यांचं विधान वस्तुस्थितीला धरून नव्हतं
मंत्र्यांनी अशी विधान करणे टाळल पाहिजे
सवंग लोकप्रियतेसाठी होणाऱ्या अशा विधानामुळे प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर होतो
On आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांना सध्या भरपूर वेळ आहे
यानिमित्ताने ते बाहेर पडले आहे
त्यांना अजून भरपूर शिकायचा आहे
वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे राज्याच्या विकासासाठी चांगल द्योतक नाही
अकोले / अहमदनगर
निवडणूक निकालाविरोधात कोर्टात जाणार…
साखर कारखाना निवडणूकीत पराभव…
पिचड गटाचा अगस्ती कारखान्यात पराभव…
जनशक्ती विरोधात धनशक्तीचा विजय..
माजी आमदार वैभव पिचड यांचा आरोप…
अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याची तक्रार…
प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही…
न्यायालय आणि आयोगाकडे मागणार दाद..
माजी आमदार वैभव पिचड यांची माहीती…
पुणे
पुण्यात एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय टोळीला अटक
कोंढवा पोलिसांची कारवाई
कोंढवा ,मोहम्मदवाडी , हांडेवाडी या भागात ही टोळी सक्रीय झाली होती
अनेकवेळा या टोळीने एटीएम मशीन फोडत चोरीचा प्रयत्न केला होता
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चौघाला अटक केली आहे
रोहित मिश्रा, शिवम तिवारी, शिवम सोनी, वाल्मिकी शुक्ला असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
चौघेही उत्तरप्रदेश येथील रहिवाशी
बीड: भगर खाल्ल्याने 100 हुन जास्त जणांना विषबाधा झाली आहे. उपवासानिमित्त भगर खाल्याने विषबाधेचा प्रकार घडला आहे. पाली, नाळवंडी, जुजगव्हाण, पोळवाडी ग्रामस्थांचा यात समावेश आहे. सर्व रुग्णांवर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधा झालेल्यामध्ये महिला रुग्णांची संख्या अधिक आहे.
मधुकरराव पिचड यांच्या २८ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागाला आहे. साखर कारखाना निवडणूकीत त्यांचा पराभव झाला आहे. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड पराभूत झाले आहेत. मधुकरराव पिचड यांना मोठा धक्का बसला आहे. अगस्ती साखर कारखाना निवडणूकीत त्यांचा पराभव झालाय. राष्ट्रवादीचे अशोक भांगरे यांनी त्यांचा पराभव केला. मुलगा वैभव पिचड याचांही दारूण पराभव झाला आहे. 28 वर्षांपासून होती पिचडांची कारखान्यावर सत्ता होती. विरोधकांनी सर्वच्या सर्व 21 जागा जिंकत पिचडांना मोठा धक्का दिला. विधानसभा , ग्रामपंचायत नंतर साखर कारखान्याची सत्ताही गमावली आहे.
भाईंदरजवळील मोर्वा गावाजवळ होत असलेल्या मेट्रोच्या नियोजित कारशेड संदर्भातला वाद पुन्हा चिघळणार
नियोजित कारशेडची जागा विकास आराखड्यात कारशेड डेपो म्हणुन आरक्षित करण्यासाठी हरकती, सूचना मागवणारी नोटीस जारी
येत्या 30 दिवसात कोकण विभागीय नगररचना विभागाच्या सहसंचालकांकडे यावर हरकती व सूचना दाखल करण्याच्या सूचना
एकीकडे कारशेडसाठी जमिन संपादनासंदर्भातील सुनावणीला नगरविकासमंत्र्यांनीच स्थगिती दिलेली आहे
आता ही जागा कारशेडसाठी आरक्षित करण्यासाठी नव्याने नोटीस जारी झाल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट
उल्हासनगरमध्ये फटाक्याच्या विनापरवाना दुकानावर कारवाई
पोलिसांकडून तब्बल 43 लाख रुपयांचे फटाके सील
दुकानदाराकडे फटाके विक्रीचा परवाना नसल्याचं उघड
नेहरू चौक परिसरातील कारवाईनं अवैध विक्रेत्यांना धडकी
चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब
सर्वोच्च न्यायालयाने ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळली
कोथरूडमध्ये मनसे विरुद्ध चंद्रकांत पाटील अशी झाली होती लढत
उच्च न्यायालयात निकालाविरोधात याचिका करण्यात आली होती ती फेटाळण्यात आली
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानंही ही याचिका फेटाळून लावली आहे
पुण्यात 35 वर्षीय व्यक्तीचा नदी पात्रात खून
भिडे पुलाजवळील असलेल्या नदी पात्रात मृतदेह असल्याची पोलिसांना मिळाली माहिती
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला
गणेश कदम असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव
हत्या झालेल्या तरुणाच्या गळ्यावर वार
नातेवाईकांनी मृत तरुणाची ओळख पटवली
गणेशची हत्या पूर्व वैमनस्यातून झाली असल्याची प्राथमिक माहिती
दीड वर्षांपूर्वी मृत तरुणाच्या भावाची देखील हत्या झाली होती
राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका निवडणुकीच्या लागली कामाला
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ॲक्शन मोडवर
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील पक्षाच्या सगळ्या सेलची बोलावली बैठक
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी जयंत पाटील व्यस्त
पिंपरीत होत आहे बैठक
बैठकीत जयंत पाटलांकडून कार्यकर्त्यांना कानमंत्र !
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रमेश शिंदे यांनी आज ठाण्यामध्ये शिंदे गटात केला प्रवेश
त्यांच्यासोबत 25 कार्यकर्त्यांनीदेखील आज प्रवेश केला
ठाणे येथील देवीच्या मिरवणुकीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी आज प्रवेश केला
पहिल्यांदा हे शिवसेनेचे नगरसेवक होते नवी मुंबईचे नेरूळमधील त्यानंतर ते राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून राहिले आहेत
त्यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा नवी मुंबईत मोठा धक्का बसलाय
पुणे
पुणे विमानतळावरून एकाच दिवशी 22 हजार 580 प्रवाशांनी केला प्रवास
कोरोनानंतर पहिल्यांदाच विमानतळावर रेकॉर्ड
एकाच दिवशी पुणे विमानतळावर 156 विमानांची ये जा
यात पुणे विमानतळावरून शुक्रवारी दिवसभरात 79 विमानांनी उड्डाण केले
तर 77 विमाने पुणे विमानतळावर राज्यातील विविध विमानतळांवरून आली होती
यात 11 हजार 474 प्रवासी पुण्यातून बाहेर गेले, तर 11 हजार 133 प्रवासी पुण्यात आले
अगस्ती साखर कारखाना निवडणूकीत माजी आमदार वैभव पिचड यांचा पराभव झाला आहे. इंदोरी गटातून वैभव पिचड यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे अशोक देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. जेष्ठ नेते मधुकरराव पिचडही पिछाडीवर आहेत. मधुकरराव पिचड यांचाही पराभव होण्याची शक्यता आहे. अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर पिचडांची होती 28 वर्षापासून सत्ता आहे. कारखान्यावर असलेल्या सत्तेला विरोधकांनी लावला सुरूंग लावला. आमदारकी, ग्रामपंचायतनंतर आता कारखान्यावरही विरोधकांची सत्ता पहायला मिळत आहे.
सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुण पाण्यात बुडून बेपत्ता
16 तासानंतरही शोध मोहीम सुरू
बोईसर पोलीस ठाणे अंतर्गत बेटेगाव येथील घटना
अभिषेक झा असं या युवकाचं नाव
दोन मित्रांसह बोईसर पूर्वीच्या बेटेगाव येथील सूर्या नदीत गेला होता पोहायला
अभिषेकने पोहण्यासाठी नदीत उडी मारली तो बाहेर परत आलाच नाही
तब्बल 16 तासानंतरही अभिषेकला शोधण्यात अपयश
मंत्री चंद्रकांत पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती
2019 च्या निवडणुकीला आव्हान दिलं होतं
या प्रकरणी उच्च न्यायालयाचा निकाल कायम राखत याचिका रद्द करण्यात आली आहे
अगस्ती साखर कारखाना निवडणुकीत मधुकर पिचडांना धक्का
28 वर्षांपासून अगस्ती कारखान्यावर असलेली सत्ता गमावली
अगस्ती कारखाना निवडणुकीत विरोधकांचा दणदणीत विजय
दसरा मेळाव्यासाठी नगरचे शिवसैनिक पायी मुंबईच्या दिशेने
250 हून अधिक शिवसैनिकांचा दसरा मेळाव्यासाठी पायी प्रवास
जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुखांसह महिलांचाही मोठ्या संख्येन सहभाग
सर्वोच्च न्यायालयाचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना धक्का
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती नाही
राणेंना बांधकाम पाडाव लागणार, दंड भरावा लागणार
जुहूतील अधीश बंगल्यातील बेकायदेशीर बांधकामाबाबत राणेंना ‘सुप्रीम’ दणका
हायकोर्टाने निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला
हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत राणेंनी घेतली होती सुप्रीम कोर्टात धाव
मुंबईच्या जुहूतील अधीश बंगल्यात बेकायदेशीर बांधकाम केल्याचा राणेंवर ठपका
अमरावती जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयातील आग प्रकरण
मृत्यू झालेल्या शिशुबाबत महत्त्वाची माहिती समोर
दगावलेल्या बाळाची प्रकृती आधीपासूनच नाजूक होती, डॉक्टरांची माहिती
गेल्या 10 दिवसांपासून व्हेंटिलेवर असलेल्या बाळाचा मृत्यू
आगीच्या घटना शिशुच्या मृत्यूसाठी कारणीभूत नव्हती
कर चुकवल्याच्या प्रकरणात अनिल अंबानींना उच्च न्यायालयाचा दिलासा
420 कोटींचा कर चुकवल्याचा अनिल अंबानींवर आरोप
17 नोव्हेंबर अंबानींवर कारवाई न करण्याचे कोर्टाचे आदेश
माझ्या मतदारसंघातून किमान 10 हजार लोक दसरा मेळव्यासाठी येतील
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा दावा
शिंदे साहेबांच्या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांना हव्या तेवढ्या गाड्या देणार
गुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा
डेमोक्रॅटिक आझाद पक्ष असं असणार नव्या पक्षाचे नाव
जम्मू-काश्मीरमध्ये गुलाम नबी आझाद यांचा राजकीय पक्ष
मंत्री उदय सामंत आणि सुधीर मुनगंटीवार गुजरातच्या दौऱ्यावर
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत उदय सामंत चर्चा करणार
गुजरातमध्ये कोणत्या नव्या योजना आहेत याची माहिती घेणार
महाराष्ट्रात चांगल्या योजना आणण्यासाठी आढावा घेणार
वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर उद्योगमंत्र्यांचं महत्त्वाचं पाऊल
निर्मला सीतारमण यांच्यानंतर सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर
बारामती तालुक्यातील विविध गावांना सुप्रिया सुळे भेट देणार
गाव भेट दौऱ्यात सुप्रिया सुळेंचा ग्रामस्थांशी संवाद
रुपयाची घसरगुंडी सुरुच! महागाई आणखी वाढण्याची शक्यता
रुपयाच्या घसरणीने ऐतिहासिक उच्चांक गाठलाय
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 56 पैशांनी घसरलाय
आता एका अमेरिकन डॉलरसाठी 81.54 रुपये माजोवे लागणार
2 ऑक्टोबरपासून राज्यात भाजपाचे ‘धन्यवाद मोदीजी’ अभियान
लोकसभेच्या मिशन 45 च्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपाचं अभियान
केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थींशी भाजप संपर्क साधणार
लाभार्थींच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना पत्र पाठवणार
दहा लाख लाभार्थींचं पत्र पंतप्रधान मोदींना पाठवण्याचं नियोजन
वेदांता-फॉक्सकॉन कंपनी गुजरातला गेल्यावरून राजकारण तापलं
शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपासह रस्त्यावरील लढाईला सुरूवात
तळेगावात आदित्य ठाकरेंनी मोर्चा काढल्यानंतर आज भाजप देखील मविआ नेत्यांविरोधात आंदोलन करणार
तळेगावात फॉक्सकॉन कंपनीची जागेचं संपादनच झाली नाही असा भाजप आणि शिंदे गटाचा
आदित्य ठाकरेंनी सभा घेतलेल्या ठिकाणीच भाजपची आज सभा होणार
आज होणाऱ्या सभेकडे राज्याचं लक्ष
पुणे-पानशेत रस्त्यावर दरड कोसळली
रुळे गावाच्या जवळ ही दरड कोसळली
दगड-माती आणि झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प
जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू
सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घटना घडली
सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
– आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण
– भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यांच्या म्हणण्याचा अर्थ वेगळा
– मागील अडीच वर्ष विरोधकांनी आंदोलन का केलं नाही, असं सावंतांना म्हणायचं होतं.
– मराठा आरक्षणावरून विरोधकांच्या टीकेवर तानाजी सावंतांचं वादग्रस्त वक्तव्य
– सत्तांतर झाल्यानंतरच आरक्षणाची खाज सुटली, असं उस्मनाबादेत म्हणाले होते
मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्सची 1 हजार अंकांची घसरण
डॉलरच्या तुलनेत रूपयांची घसरण झाल्यानं शेअर बाजारात घसरण
गुंतवणूकदरांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का
काही मिनिटांत कोट्यवधी रुपयांचा चुराडा
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून सुप्रीम कोर्टात याचिका
जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
सुप्रीम कोर्टमध्ये आज सुनावणी होणार
वाशी टोलनाक्यावर डंपरची 12 वाहनांना धडक
डंपरचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती
रविवारी झालेल्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर
अपघातात दोघे जखमी, महानरपालिका रुग्णालयात उपचार सुरु
धडक दिलेल्या गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
डंपर मुंबईहून पनवेलकडे जात असताना घडला भीषण अपघात
नारायण राणेंच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
अधीश बंगल्यावरील बांधकामावर राणेंची याचिका
बंगल्यातील काम नियमित करुन देण्यासाठी राणेंची याचिका
बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या पालिकेच्या आदेशाला आव्हान
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन मंजूर
मनी लाँड्रिंग प्रकरणी पतियाळा हाऊस कोर्टाकडून जामीन
50 हजारांच्या जातमुचलक्यावर जॅकलिनला अंतरिम जामीन
सुक्रेश चंद्रशेखर 200 कोटी घोटाळा प्रकरणी चौकशी झाली…
राजस्थानमध्ये काँग्रेस आमदारांचा हाय व्होल्टेज ड्रामा
गेहलोत समर्थक आमदारांच्या हायकमांड समोर दोन अटी
पायलट यांच्या मुख्यमंत्रीपदाला 92 आमदारांचा विरोध
सचिन पायलट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना भेटणार
पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांबाबत पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
घोषणा देणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आदेश
पण घोषणा देणाऱ्यांवरील देशद्रोहाचं कलम पोलिसांनी मागे घेतलं
उद्या निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिलेली मुदत संपणार
शिवसेना निवडणूक आयोगाकडे उद्या पुरावे सादर करणार सूत्र
उद्याच सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी
अंबरनाथमध्ये स्कूल बसचा अपघात
विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस उलटली
सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी नाही
थोडक्यात मोठा अनर्थ टळला!
स्कूलबसच्या अपघातामुळे पालकांची घाबरगुंडी
ग्रीन सिटी संकुलात सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास अपघात
अपघातग्रस्त बस क्रेनच्या साहाय्याने हटवली
अपघातामुळे स्कूल बसने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणारे पालकांची चिंता वाढवली
पुन्हा एकदा स्कूल बसच्या सुरक्षेसोबत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सवाल
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं आता ‘मिशन कोकण’
7 ऑक्टोबरपासून राज ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर
कोल्हापुरातून राज ठाकरे तळकोकणात उतरणार
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात प्रत्येकी दोन दिवस दौरा
-जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसपासून दूर झालेले गुलाम नबी आझाद नव्या वाटेवर
– लवकरच नव्या पक्षाची घोषणा करणार
– आझाद रविवारी जम्मूला पोहोचले.
– जवळच्या नेत्यांशी दीर्घ चर्चा केली.
– सध्याची राजकीय स्थितीसह पक्षाच्या नावावरही चर्चा.
राजस्थामध्ये मोठा राजकीय भूकंप निर्माण झाला आहे. अशोक गेहलोत यांच्या गटाच्या 92 आमदारांनी एकाचवेळी राजीनामा दिला आहे. 92 आमदारांनी एकाचवेळी राजीनामा दिल्याने काँग्रेसचे सरकार अस्थिर बनले आहे.
शिंदे, फडणवीस सरकारकडून शिवभोजन थाळी योजनेचा आढावा
शिंदे -भाजप सरकार उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत
शिवभोजन थाळी योजनेते गौरव्यवहार आहे का? सरकारने मतं मागवली
शिवभोजन थाळी योजनेचा शिंदे -भाजप सरकार आढावा घेणार
योजनेत गैरव्यवहार आढळल्यास सरकार कारवाईच्या तयारीत
पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात
टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कार डिव्हाडर पार करुन विरुद्ध लेनमध्ये घुसली
कारमधील चार प्रवाशी एअरबॅगमुळे बचावले
अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी
साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना भीषण अपघात
अमरावतीच्या रुग्णालयामध्ये रविवारी आगडोंब, एका बाळाचा मृत्यू
12 दिवसांच्या कोवळ्या जिवाला अग्नितांडवाचा फटका, उपचारादरम्यान तान्ह्या बाळाचा मृत्यू
एक बाळ दगावलं, आणखी एका बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती
व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन पेट घेतल्यानं लागली होती आग
आगीनंतर वॉर्डमधील रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट केलं
शॉर्ट सर्किटमुळे व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याचा संशय
दोन दुचाकींचा भीषण अपघात, पाच जण जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर आकेरी तिठा परिसरातील घटना
जखमींवर सावंतवाडीच्या एका रुग्णालयात उपचार सुरू