Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर सुरूच, 2382 नवे कोरोना रुग्ण, तर मृत्युंचा आकडाही चिंता वाढवणारा

| Updated on: Jul 16, 2022 | 6:18 PM

आज महाराष्ट्रात जो कोरोना रुग्णांचा आकडा (Maharashtra Corona Update) आढळून आलाय तोही अतिशय चिंताजनक आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 2382 नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.

Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर सुरूच, 2382 नवे कोरोना रुग्ण, तर मृत्युंचा आकडाही चिंता वाढवणारा
राज्यात कोरोनाचा कहर सुरूच, 2382 नवे कोरोना रुग्ण, तर मृत्युंचा आकडाही चिंता वाढवणारा
Image Credit source: heedgemarkets.com
Follow us on

मुंबई : गेल्या अडीच तीन वर्षात कोरोना नावाच्या विषाणुने (Corona Update) जगाला हैराण करून सोडले आहे. या कोरोनामुळे अनेकदा लॉकडाऊनला ही सामोरे जावं लागलं. दिवसेंदिवस या कोरोनाचे नवे वेरियंट आढळून येऊ लागले आहेत. आता पुन्हा कोरोनाचे दोन नवे वेरियंट आढळून आल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. आधी पहिली लाट, पुन्हा कोरोनाची दुसरी लाट, त्यानंतर तिसरी लाट आणि आता चौथ्या लाटेचा (Corona Fouth Wave) सामना जग करत आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही चिंता वाढवणारी आहे. तसेच आज महाराष्ट्रात जो कोरोना रुग्णांचा आकडा (Maharashtra Corona Update) आढळून आलाय तोही अतिशय चिंताजनक आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 2382 नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा धडकी भरली आहे, तर आता नव्याने आढळलेले व्हेरियंटही जास्त धोकादायक ठरत आहेत.

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

नव्या व्हेरियंटचा धुमाकूळ

आता ऐन पावसाळ्यात बीए 4 व्हेरियंटने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. बीए 4 वेरीएंट्स चे गेल्या 24 तासात नवे चार रुग्ण आढळून आलेत. तर दुसरीकडे बीए 5 व्हेरिएंट त्यापेक्षाही जास्त धुमाकूळ घालत आहे. कारण यावेळी चे तब्बल एकतीस रुग्ण आढळून आलेले आहेत. तर बीए 2.77 व्हेरियंटचे आठ रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पुन्हा चिंता वाढली आहे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता ही जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यात जास्त काळजी घेणे गरजेचे असते. सर्दी, ताप, खोकला यासारखे आजार पावसाळ्यात थैमान माजवतात. त्यातच आता कोरोनाने पुन्हा जोर धरल्याने डोकेदुखी वाढली आहे. विशेष करून शहरांमध्ये पुन्हा रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे.

महाराष्ट्राची चिंता वाढली

गेल्या अडीच वर्षात कोरोनाचा फटका जगासह महाराष्ट्राला ही मोठ्या प्रमाणात बसला आहे. पहिली आणि दुसरी लाट तर न विसरणाऱ्या वेदना देणारी ठरली आहे. आता बऱ्यापैकी लोकांचे लसीकरण झाल्यामुळे तिसऱ्या लाटेचा एवढा प्रभाव जाणवला नव्हता. मात्र चौथ्या लाटेने पुन्हा जोर धरल्याने लसीकरण मोहीम अधिक वेगवान करावी लागणार आहे, तसेच बुस्टर डोसवरही भर द्यावा लागणार आहे.