पुणे | 18 नोव्हेंबर 2023 : आज राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक होत आहे. मराठा समाज मागास आहे का? याची चाचपणी करण्यासाठी ही बैठक होणार आहे. पुण्यात राज्य मागासवर्गीय आयोगाची ही बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता व्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये बैठकीला सुरुवात होणार आहे. मराठा आरक्षणावर आज महत्त्वाची चर्चा आयोगात होणार आहे. राज्य मागास आयोगाच्या अध्यक्षांसह 10 सदस्य बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मराठा समाज मागास आहे की नाही, याची चाचपणी केली जाणार आहे. दरम्यान संभाजीराजे छत्रपती हे देखील आयोगाची भेट घेणार आहेत.
स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे आणि शिष्टमंडळ आज राज्य मागासवर्गीय आयोगाची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मागासवर्गीय आयोगासोबतच्या भेटीला महत्व आहे. सकाळी 11 वाजता राज्य मागासवर्गीय आयोगाची ते भेट घेणार आहेत. आहेत. आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचं आर्थिक दृष्ट्या मागास असल्याची पडताळणी सध्या केली जात आहे. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने ही भेट महत्वाची आहे.
आयोगाचे अध्यक्ष -माजी नयायमूर्ती आनंद निरगुडे, तसंच मागासवर्गीय आयोगाचे 10 सदस्य तिथे उपस्थित आहेत. अंबादास मोहिते, चंद्रलाल मेश्राम, एस एल किल्लारीकर, संजीव सोनावणे, गजानन खराटे, नीलिमा सराप, गोविंदा काळे, लक्ष्मण हाके, ज्योतीराम चव्हाण, आ. ऊ. पाटील, मेघराज भाते हे सदस्य उपस्थित आहेत.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्म आहे, असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणासाठी पुन्हा सर्व्हे होणार आहे. त्यासाठी तीन मोठ्या संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.
राज्यातील मराठा समाजाच्या कुणबी असण्याचे पुरावे सापडत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणालेत. आतापर्यंत 220000 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. कुणबी असण्याची एक नोंद शे दीडशे लोकांना प्रमाणपत्र मिळवून देईल. 30 नोव्हेंबरनंतर शिंदे कमिटी हे तेलंगणा हैदराबाद आंध्रप्रदेशमध्ये जाऊन काम करेल. मराठवाड्यातील समजाला कुणबी दाखला मिळेल, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासह ओबीसी समाजाला आश्वासन दिलं आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार आहे. पण त्यामुळे ओबीसींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.