मुंबईतील जुन्या विधानसभा मतदारसंघांमध्ये विलेपार्लेचा समावेश होतो. ही जागा उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील आहे. मुंबई उपनगरामधल्या मध्यमवर्गीय आणि उच्च-मध्यमवर्गीय मतदारांचं प्राबल्य या मतदारसंघात दिसून येतं. पश्चिम उपनगरांतील मराठी वस्तीचा भाग म्हणजे विलेपार्ले शहर. जुन्या काळी या भागात असलेल्या विर्लेश्वर आणि पार्लेश्वर या दोन मंदिरांच्या नावावरुन विले-पार्ले असं या शहराचं नाव पडल्याचं बोललं जातं. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळही याच (Vile Parle Vidhan Sabha) मतदारसंघात येतं.मराठी भाषिक लोकांचं प्रमाण इथ जात असला तरी गेल्या काही वर्षांपासून इथला गुजराती टक्काही वाढत चालला आहे.
विलेपार्ले मतदासंघ हा कोणत्याही पक्षाचा असा गड म्हणून राहिलेला नाही. जो काम करेल त्याला मत मिळेल त्यानुसार इथल्या सजग मतदारांनी आत्तापर्यंत मतदान केलं आहे. या मतदारसंघात सुरूवातीला तीन वेळा काँग्रेस मग जनता पक्ष, पुन्हा काँग्रे, अपक्ष आणि नंतर शिवसेना यांनी ही जागा जिंकली. 2004 आणि 2009 मधील निवडणुकीत काँग्रेसने विलेपार्ले मतदारसंघ पुन्हा काबीज केला. पण 2014 साली या जागेवर पहिल्यांदा भाजपचं कमळ फुललं. नंतर 2019 मध्ये भाजपने तो गड कायम राखत पुन्हा विजय संपादन केला. या मतदारसंघात 277 मतदान केंद्र आहेत.
भाजपचा मोठा विजय
2019 साली भाजप उमेदवार ॲडव्होकेट पराग अळवणी यांनी मोठा विजय मिळवला. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून ते पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हा त्यांनी शशिकांत पाटकर यांचा पराभव केला. पहिल्या निवडणुकीत पराग अळवणी हे 32 हजार मतांनी जिंकले होते मात्र 2019मध्ये मध्ये शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे त्यांनी काँग्रेसचे उमेदवार जयंतीभाई सिरोया यांचा 58 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. त्यांच्यावर विश्वास ठेवत भाजपने त्यांना विलेपार्ले येथून तिसऱ्यांदा संधी दिली असून ही निवडणूक जिंकून विजयाची हॅटट्रिक करण्याचा त्यांचा निर्धार आहे. मविआमधून या मतदारसंघात कोणाला संधी मिळते, तो उमेदवार अळवणी यांची विजयी घौडदौड रोखू शकतो का याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
2011 च्या जनगणनेनुसार, विलेपार्ले मतदारसंघात शहरी मतदार सर्वाधिकआहेत. विधानसभा मतदारसंघात 2 लाख 64 हजार 705 शहरी मतदार होते. या जागेवर सर्वाधिक लोकसंख्या मुस्लिम आणि ख्रिश्चनांची आहे. जुलै 2021 मध्ये पराग अळवणी प्रसिद्धीच्या झोतात आले जेव्हा भाजपच्या 12 आमदारांना सभागृहाने निलंबित केले होते.विधानसभेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी या आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. नंतर सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांना दिलासा दिला.
विधानसभा निकाल 2019
1) पराग अळवणी – भाजप – 84 हजार 991 मतं
2) जयंती जिवाभाई सिरोया – काँग्रेस – 58 हजार 427 मतं
3) जुली ओमकर शेंडे – मनसे – 18 हजार 406 मतं
4) नोटा – इतर – 4 हजार 286 मतं
5) सुंदरराव बाबुराव पद्मुक – इतर – 3 हजार 867 मतं