राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, मनसे नेत्यांची शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक, उमेदवारांवर आजच होणार शिक्कामोर्तब

| Updated on: Sep 23, 2024 | 10:28 AM

गेले काही दिवस महाराष्ट्रात विविध दौरे केल्यानंतर आता राज ठाकरेंनी एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला प्रत्येक विधानसभा मतदारसंघांबद्दल आढावा घेतला जाणार आहे.

राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, मनसे नेत्यांची शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक, उमेदवारांवर आजच होणार शिक्कामोर्तब
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Follow us on

MNS Raj Thackeray Meeting Today : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या ॲक्शन मोडवर आले आहेत. गेले काही दिवस महाराष्ट्रात विविध दौरे केल्यानंतर आता राज ठाकरेंनी एक महत्त्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला प्रत्येक विधानसभा मतदारसंघांबद्दल आढावा घेतला जाणार आहे.

राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला पक्षातील महत्त्वाचे नेते, सरचिटणीस आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. सध्या या बैठकीला अनेक महत्त्वाचे मनसे नेते दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या शिवतीर्थावर बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, रिटा गुप्ता, संदीप देशपांडे हे नेते उपस्थित आहेत.

विधानसभा निहाय आढावा घेतला जाणार

मनसे नेते आणि निरीक्षक यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये आढावा घेत चाचपणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह मनसे नेते आणि नेमलेले निरीक्षक यांच्याकडून राज्यातील विधानसभा निहाय आढावा घेतला जाणार आहे. तसेच राज ठाकरे आगामी काळात पुढील दौऱ्याबद्दलही निर्णय होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा दौरा केला होता. यानंतर आता महाराष्ट्रातील उर्वरित भागांमध्ये आणि विदर्भातील काही भागात पुन्हा आगामी काळामध्ये दौरा करणार आहेत. राज ठाकरेंनी मनसे विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक मतदारसंघांमध्ये मनसेची जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. तसेच याच बैठकीत राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उमेदवारीसंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. अमित ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे बोललं जात आहे.

मनसेच्या उमेदवारांची यादी

1. शिवडी, मुंबई – बाळा नांदगावकर
2. पंढरपूर – दिलीप धोत्रे
3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे
5. चंद्रपूर – मनदीप रोडे
6. राजुरा – सचिन भोयर
7. वणी – राजू उंबरकर