वाशिम : माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे 23 तारखेला पोहरादेवी येथे दाखल झाले होते. यावेळी पोहरादेवी गडावर संजय राठोडांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. राठोड समर्थकांच्या त्या गर्दीनंतर महंतांसह 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. पोहरादेवी येथे आणखी 21 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनानं पोहरादेवी कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. (Maharashtra Washim Corona Update twenty one people found corona positve at Poharadevi)
पोहरादेवी येथील 21 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं बाधितांची संख्या 30 वर पोहोचली आहे. 22 फेब्रुवारी पासून पोहरादेवी इथं आतापर्यंत महंत कबिरदास यांच्यासह 30 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे प्रशासनानं पोहरादेवी परिसराला कंटेन्मेट झोन जाहीर केले आहे.
कोरोना संसर्गामुळे वाशिम जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आलं होते. जिल्ह्यात अजूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळालं आहे. आज दिवसभरात 187 कोरोना रुग्ण आढळून आले तर 41 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात 24 तासात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात मागील पाच दिवसात एक हजार अकरा कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8 हजार 934 वर पोहोचली आहे. वाशिमध्ये सध्या 1419 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 7354 जण कोरोनामुक्त झाले असून 160 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आणि कुठलाही कार्यक्रम न घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत पोहरादेवी येथे नियमांना तिलांजली दिली. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील गर्दीप्रकरणी निष्पन्न झालेल्या 10 जणांसह 8 ते 10 हजार लोकांवर गुन्हा दाखल केलाय. आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये अंतर्गत वाशिम जिल्ह्याच्या मानोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह: खोट बोलून सत्ता आणली, खोटं बोलून सत्तेचे इमले रचले, सत्तेसाठी देश विकायला काढला. समोर आलेलं चांगलं चित्र त्यांनी भंग केलं. महाराष्ट्राच्या हिताचं स्वप्न पुढं घेऊन जातोय. सत्ता नसताना महाराष्ट्र आणि सरकारची बदनामी करु नका, फडणवीसांना टोला pic.twitter.com/1fPbfwtWJq
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 28, 2021
संबंधित बातम्या:
Corona | दिलासादायक…27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात अॅक्टिव्ह केसेस 15 हजारांपेक्षा कमी
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांनी तपासणी करुन घ्या : चंद्रकांत खैरे
‘मिशन लसीकरण’; राज्यात कोरोना लसीकरणाच्या कामाला वेग; चांद्यापासून बांद्यापर्यंत जय्यत तयारी!
(Maharashtra Washim Corona Update twenty one people found corona positive at Poharadevi)