मुंबई : राज्यात पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या काही तासात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गासह कोकण किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याशिवाय पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर याठिकाणीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Alert IMD issue warning Heavy to very heavy rainfall alert for all regions)
पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस
भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसायट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे.
सातारा, पुणे आणि रत्नागिरीला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग , रायगड आणि पालघरला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. औरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूरला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
The IMD has further upgraded its weather warnings for Palghar, Thane and Raigad to a red alert pic.twitter.com/Db0fQ4qrMc
— Richa Pinto (@richapintoi) June 17, 2021
कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राला ऑरेंज अॅलर्ट
पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांमध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये विविध ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
19 आणि 20 जूनला महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात रेड किंवा ऑरेंज अॅलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
?हवामानाचा अंदाज आणि इशारा
?मुंबई, ठाणे, रायगड, पालघर – मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईसह ठाण्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, तर काही भागात अति मुसळधार पाऊस
?कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. ऑरेंज अलर्ट जारी, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
?मध्य महाराष्ट्र – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.
?मराठवाडा – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
?विदर्भ – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता
सांगलीत मुसळधार पाऊस, कृष्णेची पाणीपातळी 23 फुटांवर, पूर भागात आपातकालीन यंत्रणा सतर्कhttps://t.co/NpRP4x7eii #Sangli #SangliRain #Maharahtrarain #Rain
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 18, 2021
(Maharashtra Weather Alert IMD issue warning Heavy to very heavy rainfall alert for all regions)
संबंधित बातम्या :
सांगलीत मुसळधार पाऊस, कृष्णेची पाणीपातळी 23 फुटांवर, पूर भागात आपातकालीन यंत्रणा सतर्क
मुंबईत पावसाचा कहर, मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू, पुढील काही तास धोक्याचे
Panchaganga River | कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर