नाशिक : सर्वसामान्य जनतेला पोटभर जेवण मिळावे याकरिता तत्कालीन महाविकास आघाडी सारकानरे शिवभोजन थाळी ही योजना सुरू केली होती. या योजनेचा सर्वसामान्य जनतेला पोटभर अन्न मिळत होतेच मात्र कोरोनाच्या काळात मात्र अनेकांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळत होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू केलेल्या शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता दाट आहे. तब्बल चार महीने होत आले तरी नवनियुक्त सरकारने शिवभोजन थाळी केंद्र चालकांना अनुदान दिले नाही. दसरा आणि दिवाळी हे दोन्ही सण केंद्र चालकांचे अंधारातच गेले आहे. चार महीने अनुदान न दिल्याने महाविकास आघाडी सरकारची शिवभोजन थाळी ची योजना बंद पाडण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप नाशिकमहडून होऊ लागलली आहे. त्यामुळे शिवभोजन थाळीची योजना बंद तर होणार नाही ना ? अशी चर्चा नाशिकमध्ये होऊ लागली आहे.
महाविकास आघाडी सरकारने गोरगरीब जनतेला दहा रुपयात पोटभर जेवण अशी योजना शिभोजन थाळीच्या नावाने सुरू केली होती.
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेबद्दल स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवभोजन थाळी बंड होणार नाही असा खुलासा केला होता.
त्यांतर शिवभोजन थाळीचा निधी राखीव ठेवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे, त्यातच शिवभोजन थाळीच्या केंद्र चालकांना अनुदान मिळत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
चार महीने उलटून गेले तरी शिवभोजन थाळीच्या केंद्र चालकांना अनुदान मिळत नसल्याने शिवभोजन थाळी बंद पडण्याचा विचार तर सरकार करत नाही ना ? असा सवालही उपस्थिती केंला जात आहे.
मागील आठवड्यात शिवभोजन थाळीची चव चाखत दादा भुसे यांनी चवीवरुन सुधारणा करा अशा सूचना देखील दिल्या होत्या. त्यामुळे सरकारचा काही प्लॅन तर नाही ना ? अशी चर्चा ही दबक्या आवाजात होऊ लागली आहे.