नगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात, 6 जण ठार

| Updated on: Jan 24, 2024 | 8:42 AM

अहमदनगर जिल्ह्यात एक भयानक अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर एक एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

नगर-कल्याण  मार्गावर भीषण अपघात, 6 जण ठार
Follow us on

अहमदनगर | 24 जानेवारी 2024 : अहमदनगर जिल्ह्यात एक भयानक अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर एक एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. बुधवारी पहाटे २ 2.30 च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण निर्मल महामार्गावर उस वाहतुक करणारा ट्रक्टर व ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांची ढवळपुरी फाटया जवळ पहाटेच्या सुमारास जोरदार धडक झाली. त्यामध्ये सहा जण जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता, की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भयानक घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातातील जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान अपघातग्रस्तांची ओळख पटविण्याचे काम चालू आहे.