नालासोपाऱ्यात पार्किंगमध्ये उभ्या वाहनांना भीषण आग, 7-8 टेम्पो जळून खाक

| Updated on: Feb 01, 2024 | 10:37 AM

नालासोपारा पूर्व धणीवबाग येथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये सात ते आठ माल वाहतुकीचे ट्रक जळून खाक झाले. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नालासोपाऱ्यात पार्किंगमध्ये उभ्या वाहनांना भीषण आग, 7-8 टेम्पो जळून खाक
Follow us on

विजय गायकवाड , टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 1 फेब्रुवारी 2024 : नालासोपारा पूर्व धणीवबाग येथे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये सात ते आठ माल वाहतुकीचे ट्रक जळून खाक झाले. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्रीच्या सुमारास पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग लागून मोठे स्फोट झाल्याने आजूबाजूचे नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर उतरले होते. या आगीच्या भडक्यात केमिकल असलेल्या ट्रेकला आग लागल्याने, त्यात मोठे स्फोट झाले. या स्फोटामुळे एक ते दीड किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील घर, बंगले यांना फटका बसला असून, आजूबाजूच्या घरांच्या काचाही तुटल्या आहेत. अनेक नागरिक रस्त्यावर उतरले.

आगीची बातमी कळताच, स्थानिक नगरसेवक पंकज पाटील यांनी तात्काळ वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. त्यांनी सुमारे तासभर अथक प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.