कुर्ला | 8 सप्टेंबर 2023 : मुंबईतील शुक्रवारची सकाळ एका भीषण आगीचे वृत्त घेऊन उगवली. मुंबईतील कुर्ला येथील झोपडपट्टीत पहाटेच्या सुमारास मोठी आग (fire in slum) लागली. कुर्ला पूर्वेकडील कुरेशी नगर येथील झोपडपट्टीतील काही घरांना आग लागल्याचे समोर आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेल नाही.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्याचे तेथील स्थानिकांच्या लक्षात आले आणि त्यांनी जराही वेळ न दवडता लगेचच अग्निशमन दलाला पाचारण केले. आगीचे वृत्त कळतचा अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवण्यास शर्नीने प्रयत्न सुरू केले. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
#WATCH | Maharashtra: A fire broke out at a slum in Kurla East of Qureshi Nagar in Mumbai, today. Fire tender present at the spot. pic.twitter.com/hDwfkri8iY
— ANI (@ANI) September 8, 2023
( डिस्क्लेमर : ही बातमी अपडेट होत आहे .)