मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांवर दु:खाचा डोंगर; डोळ्यात आश्रू, पुण्याचा आक्रोश मोर्चा अर्धवट सोडून परतले

| Updated on: Jan 05, 2025 | 2:56 PM

संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पुण्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे, या मोर्चात सहभागी होण्यासाठी जरांगे पाटील देखील गेले होते, मात्र ते मोर्चा अर्धवट सोडून परतले आहेत.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांवर दु:खाचा डोंगर; डोळ्यात आश्रू, पुण्याचा आक्रोश मोर्चा अर्धवट सोडून परतले
Follow us on

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, यामुळे आता राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. आज पुण्यात आक्रोश मोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांसोबतच संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील उपस्थित आहे. आतापर्यंत जेवढे मोर्चे झाले, त्या मोर्चाला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील उपस्थित होते. त्यांनी या मोर्चामधून जोरदार हल्लाबोल केला.  आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली.

दरम्यान ते पुण्यातील मोर्चात सहभागी होण्यासाठी देखील आले होते. मात्र हा मोर्चा त्यांनी अर्धवट सोडला आहे, आणि ते पुन्हा परतले आहेत. त्यांनी या मोर्चामध्ये आंदोलकांच्या गाठीभेटी घेतल्या आणि मोर्चातून माघारी परतले. मोठ कारण समोर आलं आहे, ते म्हणजे जरांगे पाटील यांच्या चुलत भावाचं अपघाती निधन झालं आहे, त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी जरांगे पाटील हे मोर्चा अर्धवट सोडून परतल्याची माहिती समोर येत आहे.

शनिवारी तिघांना अटक  

दरम्यान संतोष देशमुख प्रकरणातील आणखी तीन आरोपींना शनिवारी पोलिसांनी अटक केलं, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक केली, तर त्यांना मदत करणाऱ्या एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे. या तिघांना अटक करून केज न्यायालयात हजर करण्यात आलं, न्यायालयानं त्यांना 18 जानेवारीपर्यंत म्हणजे 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणात वाल्मिक कराड वर देखील आरोप करण्यात आले होते, तो देखील या आधीच पुण्यातच सीआयडीला शरण आला आहे.  संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे.