मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली, उपचार सुरू

| Updated on: Nov 15, 2024 | 6:54 PM

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना ताप, खोकला आणि सर्दीचा त्रास होत असून त्यांच्यावर अंतरवालीमध्येच उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली, उपचार सुरू
MANOJ JARANGE PATIL
Follow us on

मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. जरांगे पाटील यांना काल रात्रीपासून ताप, खोकला आणि सर्दीचा त्रास सुरू झाला आहे. जरांगे पाटील यांच्यावर अंतरवाली सराटीमध्येच उपचार सुरू करण्यात आले आहेत.  काल रात्री त्यांना ताप आला, त्यानंतर त्यांना खोकला आणि सर्दीचा त्रास देखील सुरू झाला. त्यामुळे त्यांच्यावर आता अंतरवाली सराटीमध्ये उपचार सुरू आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण मंजूर केलं, मात्र मनोज जरांगे पाटील अजूनही मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय देखील घेतला. विधानसभेसाठी त्यांनी मराठा, दलित आणि मुस्लिम समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. जीथे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, तीथे उमेदवार देऊ, जिथे शक्यता नाही तीथे आमच्या मागण्यांचं जो समर्थन करेल त्या उमेदवाराला पाठिंबा देऊ अशी त्यांची भूमिका होती. मात्र त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली.

त्यानंतर आता त्यांनी आपली पुढची दिशा स्पष्ट केली आहे. मराठा समाज सुज्ञ आहे, त्यांना फार काही सांगण्याची गरज नाही. मी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही, त्यामुळे मराठा समाजाला वाटेल त्या उमेदवाराला ते पाडतील ज्याला निवडून आणायचं आहे त्याला निवडून आणतील. मात्र हे सर्व करत असताना आरक्षणाचा प्रश्न डोक्यात असू द्या, आपल्या विरोधात कोण आणि बाजूनं कोण हे लक्षात घ्या. गाव पातळीवर उमेदवाराचे मागणीला पाठिंबा दिल्याचे व्हिडीओ बनवा, मात्र ते व्हायरल करू नका असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजला केलं आहे.