ठाण्यातील एका माणसामुळे अनेकांनी पक्ष सोडला; अजित पवार यांची नाव न घेता जितेंद्र आव्हाडांवर टीका

| Updated on: Feb 18, 2025 | 8:41 PM

पुढे मी नांदेड,परभणीला जाणार आहे. तिथेही पक्षप्रवेश आहेत. हवशे नवशे गवशे सगळे येतात आणि म्हणतात की मला महामंडळ द्या, मला DPDC चं हे द्या, पण आपण काय केलं याचा वापर करा असाही सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

ठाण्यातील एका माणसामुळे अनेकांनी पक्ष सोडला; अजित पवार यांची नाव न घेता जितेंद्र आव्हाडांवर टीका
Follow us on

राज्याच्या अर्थ संकल्पाला शिस्त लावण्याचा आपला विचार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.’लाडकी बहिण योजना’ सुरुच रागणार आहे.महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छीतो की ‘लाडकी बहीण योजना’ बंद होणार नाही. मात्र जे पात्र आहेत त्यांनीच या योजनेचा लाभ घ्यावा असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पढे म्हणाले की मंगळवारचा दिवस हा माझ्यासाठी महत्त्वाचा असतो. कॅबिनेट,  प्री-कॅबिनेट असते. आता अर्थसंकल्प सादर करायचा आहे. उद्या शिवजयंती असल्याने मी आणि एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही सकाळी सात वाजता शिवनेरी किल्ल्यावर जाऊन नतमस्तक होणार आहोत.

आमचा शिवस्वराज्य सप्ताह सुरु होणार आहे. मी तरुण होतो तेव्हा  एकत्र राष्ट्रवादी होती त्यातून काम करत इथपर्यंत आलो आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट सध्या सुरू आहे. जो जोरदार सुरू आहे. ठाणे जिल्हा मोठा जिल्हा आहे. त्यातून पालघर वेगळा  काढला आहे. ठाणे जिल्ह्यातील शाई प्रकल्प आणि काळू प्रकल्पाबाबत अनेक मतप्रवाह आहेत, पण ते प्रकल्प वेळेत पूर्ण  झाले पाहिजे. अभिजित पवार आले, ते कोणासोबत काम करायचे माहित होते, ती भावकी होती तरी माझ्याकडे यायला उशीर लागला. अभिजीत जात असताना अनेकांचे आतापर्यंत देखील फोन येत होते, बोलले मार्ग काढू, मग आतापर्यंत काय गोट्या खेळत होते? असा सवाल अजित पवार यांनी यावेळी केला.

जुन्यांचा देखील मान राखला जाईल

ठाण्यातील एका माणसामुळे अनेक लोक गेले. मी वरिष्ठांना अनेकदा सांगितलं. पण चूकच करायची ठरवली तर कोणीच काहीच करू शकत नाही. माझी पत्नी लोकसभेला ४८ हजार मतांनी पडली. बारामतीतच मत कमी, एवढं काम केलं होतं. पण मतदारांचा हक्क असतो. ‘लाडकी बहिण’ योजना यशस्वी झाली. लोकाभिमुख काम देखील करायची असतात. नेत्याकडे व्हीजन असले पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. उमेदवारी देताना नव्या जुन्याचा समन्वय साधून उमेदवारी दिली जाईल. पक्षात जेव्हा बेरीज वाढते तेव्हा जुन्याना वाटतं की आम्ही अडचणीच्या काळात सोबत होतो, तेव्हा आमचे काय ? पण जुन्यांचा देखील मान राखला जाईल असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

हे सुद्धा वाचा