Manoj Jarange Patil : मी एकटा पडलोय… मनोज जरांगे यांचं मराठा बांधवांना आवाहन काय ?

| Updated on: Jun 24, 2024 | 1:10 PM

शंभुराज देसाई यांनी 13 तारखेपर्यंत शांत राहण्याचं दोन्ही गटाला सांगितलं. शंभुराज देसाई यांच्या शब्दाला मान देतो. मी आजपासून कुणाच्या प्रश्नावर बोलणार नाही. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्यानुसार करा, हैदराबादचं गॅझेट लागू करा, असं आमचं सांगणं आहे. मी आरक्षण दिल्याशिवाय मागे हटत नाही. पण शंभुराज देसाई यांच्या शब्दाला मान देतो, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय.

Manoj Jarange Patil : मी एकटा पडलोय... मनोज जरांगे यांचं मराठा बांधवांना आवाहन काय ?
मनोज जरांगे पाटील
Image Credit source: Facebook
Follow us on

मनोज जरांगे पाटील यांनी एक महिन्यासाठी उपोषण स्थगित केलं असलं तरी आंदोलन मात्र सुरूच आहे. मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी कंबर कसली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या डेडलाईनच्या आधी मोठी रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. आठ दिवस ही रॅली चालणार आहे. सरकारवर दबाव आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी ही रॅली काढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या रॅलीत महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. 6 जुलै ते 13 जुलै पर्यंत शांतता जनजागरण रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्या रॅलीला या. शांततेत या. 6 जुलैपर्यंत सर्व कामे आटोपून घ्या. त्या दिवशी एकानेही घरात थांबू नका. लग्न कार्यालाही जाऊ नका. ताकदीने रस्त्यावर या. आपल्याला घेरलंय. मी एकटा पडलोय. मी हटणार नाही. मेलो तरी मी मागे हटणार नाही. आपल्या रॅलीला आया बहिणींसह सर्वांनी एकत्र या. शांतता राहिली अत्यंत मोठी झाली पाहिजे, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

आरक्षणापेक्षा पद आणि मते मोठे आहेत काय?

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील मराठा समाजांना सांगतो आणि नेत्यांनाही सांगतो. सर्व पक्षातील ओबीसी नेते मराठ्यांना कायदेशीर आरक्षण देऊ नये म्हणून एकवटले आहेत. ते मतांचा विचार करत नाही, ते आरक्षणाचा विचार करत आहेत. मराठा नेते मतांचा विचार करत आहेत. आरक्षणाचा विचार करत नाहीत. ओबीसी नेत्यांना मतांची गरज नाही. त्यांना आरक्षण हवं आहे. यावरून आरक्षण किती मोठा मुद्दा आहे हे लक्षात घ्या. सर्वच पक्षातील ओबीसी नेते एकत्र आले आहेत. विरोधी पक्षातील ओबीसी नेतेही एकत्र आले आहेत. कोणीही पक्षाला जुमानत नाहीत. सर्व ओबीसी नेते एकवटले आहेत. म्हणजे मराठा नेत्यांना समजत नाही का? ते मताला आणि पदाला किंमत देत नाही. तुम्ही का करत नाही? तुम्हाला कळत नाही का?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.

मी एकटा पडलोय

मी आता एकटा पडलो आहे. मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून मला घेरलं आहे. आपण एकजूट राहा. मराठा नेत्यांना आवाहन करतोय की, जातीचं आरक्षण मोठं आहे. तुम्ही पद आणि मतांकडे पाहू नका. हात जोडून विनंती आहे. माझी जात संकटात सापडली आहे. ताकदीने उभं राहा. हसण्यावर नेऊ नका, असं ते म्हणाले.