सरकारने सडेतोड भूमिका घेतल्याशिवाय आता पर्याय नाही. कायदा काय म्हणतोय, मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी आहे. हैदराबाद गॅझेट सांगतंय त्या सरकारी नोंदी आहेत.त्याचा रेकॉर्ड तपासलं जात नाहीये, ते आधी तपासायला तातडीने सुरूवात करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्र्यांकडे केली.
गावागावासह , तालक्या-तालुक्यासह हैदराबाद संस्थानच्या या सरकारी नोंदी आहेत. या देशात आणि राज्यात कोणाच्याही सरकारी नोंदी नाहीत, तरी त्यांना आरक्षण मिळतंय. मराठ्यांना १३ तारखेच्या आत आरक्षण देणं हे बंधनकारक आहे. तुम्ही जे खोटं आहे, जे बोगस आहे ते दिलं, जे सत्य आहे ते दिलं नाही. त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपण खूपच स्पष्टपणे बोलणं गरजेचं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना थेट सरकारलाच इशारा दिला आहे.
कुणी आंदोलन केलं म्हणून नोंदी थांबवणार का ?
सरकारी नोंदी मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या आहेत, ते घेणं गरजेचं आहे. सातारा संस्थानच्या नोंदी सरकारी आहेत, त्या घेणंही गरजेचं आहे, पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना ते कामाला येईल.ब्रिटीश कालीन बॉम्बे गॅझेट हेही घेणं सरकारला गरजेचं आहे, म्हणजे तिथला सगळा प्रदेश आरक्षणाखाली येतो.
कुणी आंदोलन केलं म्हणून नोंदी थांबवणार का ? असा सवाल त्यांनी विचारला. कुणी आंदोलन केलं म्हणून सरकारी नोंदी थांबवणार असाल तर सरकारच अस्तित्वात आहे की नाही याचा विचार महाराष्ट्रातल्या, देशातल्या जनतेला करावा लागेल. मराठवाड्यातला मराठा समाज कुणबी, असं कायदा सांगतो. सरकारी नोंदी कोणाला नाकारता येत नाहीत. गावागावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या आहेत, असं जरांगे पाटील म्हणाले.
मी गोधा पट्ट्यात काम करत होतो बाहेर काम करतांना समाजाला सरकारला सांगितले.८३ क्रमांकाचा ओबीसी मराठा एक आहे.2004 ला मराठा कुणबी एक कायदा पारित करण्यात आला.आता याला जोडून सरकारच म्हणणं कुणबी 83 क्रमांकला आहे.कुणबी मराठा वेगळा आहे म्हणत असाल तर प्रमुख जाती घातल्या नंतर 1994 तेव्हा 350 जाती झाल्या. मग या जाती झाली कशी? महाजन म्हणाले मराठा कुणबी वेगळं आहे. माळी असताना माळी समाजातील पोट जाती कष्या घेतल्या? जर त्यांची पोट जात होऊ शकाते तर मराठा समाजाची कुणबी पोट जात होऊ शकत नाही का? असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला.
1994 ला दिलेलं आरक्षण रद्द करा
1994 साली दिलेलं आरक्षण तातडीने रद्द करा. हे आरक्षण दिलं कसं ते 13 तारखेच्या अगोदर सांगा.व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं असल तर आम्ही आमचा व्यवसाय दाखवतो. माळी समजा शेती करतो म्हणून दिलं असेल तर आम्हाला पण द्या.
मुस्लिम समाजाच्या सरकारी नोंदी निघाल्या आहे.यामुळे मुस्लिमांना देखील ओबीसी मधून आरक्षण द्या. कसं देत नाही ते बघतो.आमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही १६ टक्के आरक्षण दिले कसं? आम्ही भाऊ मानलं मात्र तुम्ही आमच्या ताटात औषध कालवलं आहे. लोहार कुंभार समाजाच्या देखील सरकारी नोंदी आधारे आरक्षण द्या.बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षण सोडून सगळं आरक्षण रद्द करा, वरचे 16 टक्के उडवून टाका
विधानसभेत गुलाल तुमच्यावर गुलाल रुसेल
सगे सोयर आमच्या व्याख्येनुसार देत असाल तर द्या, नाही तर देऊ नका. वाशी मध्ये उधळलेला गुलालाचा अपमान करू नका.नाही तर विधानसभेत गुलाल तुमच्यावर गुलाल रुसेल असा इशाराही जरांगे यांनी दिला.
भुजबळांची शेपूट वाढत चालली आहे
यावेळी जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावरही कडाडून हल्ला चढवला. सरकार मनोज जरांगे लढणार आहे.तुम्ही आरक्षण घालवलं तर मी सोडणार नाही.शेपूट लांबलं म्हणायचं नाही.जे मराठ्याला आहे ते भुजबळ ला पाहजे.यामुळे भुजबळ ची शेपूट वाढत चालली आहे अशी टीका त्यांनी केली.
धनंजय मुंढे म्हणाले मागेल त्याला द्यायचं म्हणत असाल तर सरसकटच राहील काय? मी म्हणालो सरसकट द्या. १० टक्के कोर्टात टिकणार नाही.बिहार मध्ये उडलं आहे.याबाबत कुणाला दोषी ठरणार.सरकारला जाऊन बोललं पाहिजे. मात्र आता म्हणता घोळ दिसतो.स्वतः घोरत होता.
तर आम्हाला राजकारणात उतरावं लागेल
मी कसा बदनाम होईल यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत.विरोधकांशी लढायला मी समर्थ आहे, मात्र आपलेच लोक विरोध करत आहे. तुम्ही नाही दिलं तर आम्हाला राजकारणात उतरावं लागेल.आचारसंहिता नंतर देऊ म्हणाल तर आम्ही ऐकणार नाही. ओबीसी असो अथवा मराठा प्रत्येकाला ठासून सांगायचं सरकारने शिकलं पाहिजे.
सरकार मराठ्याला देताय काय? फक्त कागद वाचता अन् जाहिराती करता का ? खोटे प्रमाणपत्र समाज देतोय का? तिथला तहसीलदार लिहून भुजबळला देत आहे. याची चौकशी करा, खर काय, काय खोटं हे होऊन जाऊ द्या.
पाहिले टप्प्यात 22 आणि दुसऱ्या टप्प्यात 43 ठिकाणी चाचपणी केली आहे. तिसऱ्या टप्प्यात पाहणी करणार आहोत. 13 पर्यंत आम्ही विधानसभेचे काही बोलत नाही. परंतु आम्ही 288 विधानसभेच्या जागा लढवली नाही तरी 288 जागा पाडू असा इशाराही जरांगेंनी दिला.
भुजबळांवर कडाडून टीका
काल ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांची छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली. तेव्हा भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्ला चढवत त्यांचा माकड असा उल्लेख केला. आज मनोज जरांगे यांनी मीडियाशी संवाद साधताना भुजबळांवर कडाडून टीका केली. ‘ त्याला काय माहीत नाही लायकी आहे.ज्यांनी तुला मोठं केलं त्यांना अटक केलीय तू काय दीलाबर म्हणतो. मोठं करणाऱ्याचे उपकार ठेवले नाही. भुजबळ भाजपचे सीट पडतो.काय दीलबऱ्या आहे रे तू? पडलेलं लोकं घेऊन दोन समाजात तेढ निर्माण करत आहे, असा आरोप त्यांनी केला