Marath reservation :  राज्यातील आरक्षणाचे प्रश्न सुटू शकतात, संभाजीराजे छत्रपती यांचे मराठा आरक्षणावर मत

| Updated on: Nov 28, 2023 | 6:09 PM

Sambhajiraje Chatrapati गरीब आणि मागासवर्गीयांना आरक्षण मिळावे ही शाहू महाराजांचीही भूमिका होती मात्र, सध्या आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य करताना आणि आपले मत मांडतांना ते प्रत्त्येकाने जाबाबदारीने मांडावे ज्यामुळे सामाजिक सलोखा राखला जाईल असं संभाजीराजे म्हणाले.

Marath reservation :  राज्यातील आरक्षणाचे प्रश्न सुटू शकतात, संभाजीराजे छत्रपती यांचे मराठा आरक्षणावर मत
संभाजीराजे छत्रपती
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाला मुद्दा सध्या राज्यात सगळ्यात ज्वलंत मुद्दा आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्यभर मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील आरक्षणाचे प्रश्न सुटू शकतात असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. संभाजीराजे छत्रपती यांची मागासवर्ग आयोगासोबत बैठक पार पडली यात सकारात्मक चर्चा झाल्याते ते म्हणाले. समाजाचे प्रश्न आम्ही आयोगासमोर मांडले असल्याचेही ते म्हणाले. सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून छगण भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. यावरही संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका मांडली आहे.

आरक्षणाच्या मुद्यावर काय म्हणाले संभाजीराजे?

गरीब आणि मागासवर्गीयांना आरक्षण मिळावे ही शाहू महाराजांचीही भूमिका होती मात्र, सध्या आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य करताना आणि आपले मत मांडतांना ते प्रत्त्येकाने जाबाबदारीने मांडावे ज्यामुळे सामाजिक सलोखा राखला जाईल असं संभाजीराजे म्हणाले. मागासवर्ग आयोगासोबत झालेली चर्चा ही अत्यंत सकारात्मक होती. केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची भुमीका महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले. केंद्रिय मागासवर्गिय आयोगाला संविधानिक जबाबदारी असल्याने ते हात झटकू शकत नाही असंही ते म्हणाले.  मागासवर्गिय आयोगासमोर मांडलेले मुद्दे हे अत्यंत महत्त्वपूर्ण होते. या मुद्द्यांच्या आधारे आरक्षणाचा मार्ग सुकर होवू शकतो असंही ते म्हणाले.

 अधिवेशनाआधी घेणार बैठक

येणाऱ्या अधिवेशनाआधी किंवा अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्रातील सगळ्या खसदारांची बैठक मी बोलावणार असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. मराठा समाजाची जबाबदारी ही सगळ्यांनी उचलायलाच पाहिजे असं, मग ते मराठा समाजाचे नसतील तरी त्यांनी पूढाकार घ्यावा अशी भुमीका त्यांनी मांडली. गरीब मराठा समाज सद्या अडचणीत आहे, त्यामुळे त्यांना न्याय देण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात जातीजातीमध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेच आहे. महाराष्ट्रात सलोखा राखण्याची जबाबदारी ही आपली सगळ्यांची असल्याचेही ते म्हणाले. मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडत आहेत. या कामाला आणखी गती येईल मात्र त्यासाठी सुविधा वाढवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.