मनोज जरांगे यांना नेमकं काय झालं? घरीच उपचार का सुरू?; आता प्रकृती कशी?

| Updated on: Oct 30, 2024 | 2:07 PM

मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. सततच्या जागरण आणि उपोषणामुळे त्यांना ताप, अशक्तपणा आणि संसर्ग झाला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आराम करण्यास सांगण्यात आले आहे.

मनोज जरांगे यांना नेमकं काय झालं? घरीच उपचार का सुरू?; आता प्रकृती कशी?
मनोज जरांगे पाटील
Image Credit source: Facebook
Follow us on

Manoj Jarange Patil Health Update : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी होणार आहे. विधानसभा निवडणुकीत मराठा मतांचे राजकारण पाहायला मिळणार आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मनोज जरांगेना नेमकं काय झालं?

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. तर विविध पक्षाचे नेते, आमदार, खासदार मराठा मतांसाठी सातत्याने जरांगे पाटील यांची भेट घेत आहे. मनोज जरांगेना भेटण्यासाठी येणारे विविध पक्षांचे पदाधिकारी, आमदार, खासदार हे रात्री उशिरा येतात. त्यांची चर्चा ही उशिरापर्यंत सुरु असते. त्यामुळे जरांगे पाटील यांचे सतत जागरण होत आहे.

तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं उपोषण करत असल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना काल रात्रीपासून ताप, अशक्तपणाचा त्रास होत आहे. तापासोबत त्यांना इन्फेक्शन देखील झाले आहे. तापासोबत अंगदुखी, अशक्तपणा, घसादुखी आणि कफ झाला आहे.

हे सुद्धा वाचा

घरीच उपचार का सुरू?

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे यांची काल रात्री तब्येत बिघडल्याने त्यांना घरीच सलाईन लावण्यात आले. तसेच त्यांच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले आहे. ते नमुने अधिक तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. सध्या मनोज जरांगे पाटील यांना विश्रांतीची गरज आहे. कारण त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. त्यामुळे त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच आज सकाळीही मनोज जरांगेंना सलाईन लावण्यात आले आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत आहे.