संतोष जाधव, प्रतिनिधी, धाराशिव | 7 March 2024 : मराठा आंदोलकांच्या एका खेळीने जिल्हा प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. अर्ज जर जास्त आले तर EVM ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची कसरत करावी लागणार आहे. मतपत्रिका व मतपेट्याचा वापर करणे पण जिकरीचे काम असणार आहे. याप्रकरणात जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
मराठा आरक्षणासाठी लढा
मराठा आरक्षणासाठी राज्यात लढा सुरु आहे. या लढ्याला यश येत असतानाच सगेसोयरेवरुन सरकार आणि मराठा आंदोलकांमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. दहा टक्के मराठा आरक्षण देऊन सरकारने फसवणूक केल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तर मराठा आंदोलक आता निवडणुकीतून त्यांचा रोष व्यक्त करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अधिकाधिक उमेदवार उभे करण्याची खेळी खेळण्याची शक्यता आहे.
तर निवडणूक बॅलेट पेपरवर
धाराशिव जिल्ह्यात 736 गावे आहेत. बार्शी व औसा या तालुक्यातील जवळपास 150 पेक्षा जास्त गावे आहेत. 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर, मतपत्रिकावर निवडणुक घ्यावी लागते. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. जास्त उमेदवारी अर्ज आल्यास EVM ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
या अचडणींचा करावा लागेल सामना