‘या लोकांना जातीचा स्वाभिमानच नाही..’ मनोज जरांगे बड्या नेत्यावर भडकले, नेमकं काय घडलं?

| Updated on: Nov 12, 2024 | 3:40 PM

या लोकांना जातीचा कसा स्वाभिमान नाही, जात म्हणजे रक्त आहे. ते जे बोलले ते खूप खेदजनक आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

या लोकांना जातीचा स्वाभिमानच नाही.. मनोज जरांगे बड्या नेत्यावर भडकले, नेमकं काय घडलं?
MANOJ JARANGE PATIL
Follow us on

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची देखील तयारी केली होती.  जिथे उमेदवार निवडूण येण्याची शक्यता आहे, तीथे उमेदवार देऊ आणि जिथे शक्यता कमी वाटते तीथे जो उमेदवार आमच्या मागणीला पाठिंबा देयील त्याला मत देऊ अशी त्यांची भूमिका होती, त्यासाठी त्यांनी मराठा, मुस्लिम आणि दलित समाजाची मोट बांधण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र त्यानंतर त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली.

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आता निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे, फक्त एका समाजाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवता येणार नसल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं, त्यानंतर भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी एक वक्तव्य केलं आहे, ‘मराठा मत बोटावर मोजण्या इतकी’ असल्याचं त्यांनी म्हटलं, या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी लोणीकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील? 

हे सुद्धा वाचा

या लोकांना जातीचा कसा स्वाभिमान नाही, जात म्हणजे रक्त आहे. ते जे बोलले ते खूप खेदजनक आहे.  यांच्या अशा वागणुकीमुळे मराठा समाज अडचणीत येत आहे. रक्त मासाचे असून अशा भाषा वापरत असतील तर समाजाने यांना ठेवलं नाही पाहिजे. यांना जिथल्या तिथे 100 टक्के धडा शिकवला पाहिजे. त्याशिवाय हे ठेप्याला येणार नाहीत.   यांना रस्त्यावर आणायची ताकद मराठा समाजामध्ये आहे आणि ते बरोबर आणतील असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आज कार्तिकी एकादशी असल्यामुळे विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जरांगे पाटील हे नारायणगडावर निघाले आहेत, त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  मी सांगत आहे माझा फोटो लावू नका, त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. मी माझा समाज बंधनमुक्त केला आहे, माझ्या ऐकण्यात समाज आहे, म्हणून मी काही माझा समाज कोणाच्या दावणीला बांधला नाही. आणि मी समाज विकलाही नाही, मी समाजाचा सन्मान केला आहे. आणि सांगितलं आहे तुम्हाला ज्याला पाडायचे त्याला पाडा, आणि ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.