कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणात मोठी अपडेट, त्या निर्णयामुळे शुक्ला कुटुंबाच्या अडचणी वाढल्या

| Updated on: Dec 21, 2024 | 3:43 PM

कल्याणमधील एका हायप्रोफाइल सोसायटीमध्ये दोन परप्रांतीय कुटुंबांकडून एका मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती, या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणात मोठी अपडेट, त्या निर्णयामुळे शुक्ला कुटुंबाच्या अडचणी वाढल्या
Follow us on

कल्यामध्ये असलेल्या एका सोसायटीमध्ये दोन दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या दोन प्ररप्रांतीय कुटुंबांनी आणि गाव गुडांनी एका मराठी कुटुंबाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. हे प्रकरण चांगलंच तापलं. याचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक केली आहे.

आरोपींमध्ये मुख्य आरोपी असलेला अखिलेश शुक्ला त्याची पत्नी गीता शुक्ला यांच्यासह  सुमित जाधव, दर्शन बोराडे,  पार्थ जाधव आणि विवेक जाधव अशा सहा जणांचा समावेश आहे. दरम्यान पोलिसांनी जेव्हा आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केलं तेव्हा  शुक्ला कुटुंबाचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये असा निर्णय मराठी वकिलांनी घेतला आहे, त्यामुळे आता शुक्ला  कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स इमारतीमध्ये काही कारणांमुळे दोन परप्रांतीय कुटुंबामध्ये वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या धीरज देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबाला या दोन कुटुंबांकडून शिविगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे बाहेरून माणंस मागवून घरात घुसून या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं याचे पडसाद थेट विधानसभेत उमटले.

या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, महाराष्ट्र आणि मुंबई ही मराठी माणसांची भूमी आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्यामुळे इथे देशभरातून लोक येत असतात, ते गुण्यागोविंदाने राहातात. अनेकजण मराठी सण देखील साजरे करतात. मात्र अशा काही लोकांमुळे  या सामाजिक सलोख्याला गालबोट लागते.

एखाद्याने काय खायचे याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. अशा तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं विधानसभेत फडणवीस यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अखिलेश शुक्ला यांचं निलंबन करण्यात आलं असून त्याला अटक करण्यात आली आहे.