शिर्डी : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. राज्य शासन आणि प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भावाला आळा बसावा, यासाठी कंबर कसलीये. राज्यातलं महत्त्वाचं देवस्थान असलेल्या शिर्डीत भाविकांची गर्दी आटोक्यात आणावी, तसंच नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं यासाठी कोरोना टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक पार पडली. (Marathon meeting of Corona Task Force in Shirdi, strict instructions for devotees, Administration action mode)
प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद म्हस्के यासह साईबाबा संस्थानचे अधिकारी, परिवहन, रेल्वे आणि शिर्डी विमानतळाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत आता पर्यंतच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला तसंच भाविक आणि नागरिकांसाठी काही नियम आणि अटी घालून देण्यात आल्या आहेत.
शिर्डीत साई बाबांच्या (Shirdi Saibaba) दर्शनाला दररोज होणारी गर्दी, गावोगावचे आठवडे बाजार, बाजारपेठ, दुकानं, लग्न, सभा, मेळावे, अंत्यविधी अशा सगळ्याच ठिकाणी नागरिक निर्धास्तपणे वागताना दिसताहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा आणि मास्क वापरण्याचा अनेकांना विसर पडल्याचे चित्र दिसत असल्याने सर्व विभागांना नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक येथे येणा-या भाविकांची तपासणी करणे आणि लक्षणे आढळल्यास उपचार करण्याच्या सूचना बैठकीत दिल्याचे प्रांतधिकारी म्हस्के यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झालीये. मुख्यमंत्र्यांनी देखील नागरिकांना तसं आवाहन केलंय. जर नागरिकांनी काळजी घेतली नाही तर पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जातीये. त्यामुळे आता नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे बनलंय.
(Marathon meeting of Corona Task Force in Shirdi, strict instructions for devotees, Administration action mode)
हे ही वाचा :
Sanjay Rathod Pohradevi visit LIVE | संजय राठोड जगदंबामातेसमोर लीन
संजय राठोड जगदंबा मातेच्या मंदिरात; पोहरादेवीत प्रचंड गर्दी, पोलिसांचा लाठीमार
स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याला जात नसते, संजय राठोडांच्या मुसक्या आवळून चौकशी करा: चित्रा वाघ