Marathwada Weather Report : मराठवाड्यातही अवकाळीची हजेरी, शुक्रवारीही पावसाचा अंदाज

| Updated on: Feb 18, 2021 | 11:25 PM

मराठवाड्यातील पावसाची स्थिती पाहायची झाली तर औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली.

Marathwada Weather Report : मराठवाड्यातही अवकाळीची हजेरी, शुक्रवारीही पावसाचा अंदाज
Follow us on

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज राज्यातील अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली होती. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, रायगड, भंडारा, यवतमाळ, बीड, वाशिम, सोलापूर, औरंगाबाद, गोंदिया, परभणी, अमरावती, बुलडाणा, पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर रात्रीच्या सुमारास मुंबईतील विविध भागातही पाऊस बरसला. मराठवाड्यातील पावसाची स्थिती पाहायची झाली तर औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली.(Rain in Marathwada, possibility of rain on 19th February)

मराठवाड्यात पावसाच्या सरी

परभणी

परभणी शहरासह तालुक्याच्या काही ठिकाणी रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तसेच काही भागात गाराही बरसल्या.परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या हवामानशास्त्र विभागाने येत्या काही दिसात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान बुधवारी रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसास सुरुवात झाली. शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त असून काही ठिकाणी गाराही बरसल्या आहेत.या अवकाळी पावसामुळे शेतीतील ज्वारी,गहू ,हरबरा हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी धामणगाव परिसरात पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह कोसळला पाऊस तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पडला गारांचा पाऊस झाला.

बीड

मध्यरात्रीच्या सुमारास बीड जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वडवणी आणि तेलगाव परिसरात गारांचा पाऊस झाला. तेलगाव येथे एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली त्यामुळे झाडाला आग लागली.

19 फेब्रुवारीला पावसाची स्थितीचा अंदाज काय?

गेल्या चोवीस तासातील पर्जन्यमान पाहायचं झालं तर विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडला. गुरुवारी मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याचबरोबर तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यताही वर्तवली गेली होती.

19 फेब्रुवारीलाही मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर 20, 21 आणि 22 फेब्रुवारीला हवामान कोरडं राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Video | Maharashtra weather forecast : हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा, राज्यभरात पाऊस बरसला, संततधार कायम राहणार

Weather Alert | परभणीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, काही ठिकाणी गाराही बरसल्या

Rain in Marathwada, possibility of rain on 19th February