मुंबई : आज राज्याच्या अर्थ संकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी जाहीर केला आहे. यामध्ये अमृतकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प ( Budget Session ) असल्याने पंचामृत ध्येयांवर हा आधारित आहे. यामध्ये शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा, पर्यावरणपूरक विकास अशी पाच पंचामृते आहेत. त्यानुसार दुसऱ्या पंचामृत मध्ये आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे.
सर्व सामान्य व्यक्तींच्या दृष्टीने आज मोठी घोषणा करण्यात आली आहे. आरोग्याच्या बाबत अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये 3 हजार 520 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे यामध्ये ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.
ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा आता दीड लाखांवरून पाच लाखांवर करण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर करत असतांना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. त्यामध्ये सर्व सामान्य रुग्णांसाठी ही मोठी घोषणा असून मोठा दिलासा मिळणार आहे.
तर दुसरीकडे आपला दवाखाना हा आरोग्य उपक्रम देखील मोठ्या प्रमाणात राबविला जाणार आहे. संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविला जात असतांना हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने 700 दवाखाने सुरू करण्यात येणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे. ही आरोग्य सेवा मोफत असणार आहे.
सर्व सामान्य जनता गंभीर आजाराशी सामना करीत असतांना उपचारासाठी मोफत सुविधा मिळावी यासाठी शासणाकडून खाजगी रुग्णालयात देखील ही सुविधा उपलंबद्ध असते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या एकत्रित योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातो.
पूर्वी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत जे लाभार्थी होते त्यांना दीड लाख रुपया पर्यन्त मर्यादा होती. एक प्रकारे ती विमा सुरक्षा होती. तिची मर्यादा वाढविण्यात आली असून पाच लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना हा मोठा दिलासा असण्याची शक्यता आहे.
दरम्यान शिंदे फडणवीस सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा आरोग्यावर भर देऊन करण्यात आला आहे. त्यामध्ये महिलांच्या साठीही खास घोषणा करण्यात आल्या आहे. याशिवाय शेतकऱ्यांवरही घोषणांचा पाऊस करण्यात आला आहे.