मराठी असल्याने गिरगावात पंचरत्न डायमंड असोसिएशनचे सदस्यत्व न दिल्याने ठाकरे गटाने संस्थेच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला आहे. या असोसिएशनचे मुंबईत १७ हजार सभासद असून संघटनेत मराठी माणसांना डावल्याचे उघडकीस आले आहे. या असोसिएशनचे सभासद होण्याासाठीचे अर्जही गुजराती आणि इंग्रजी भाषेत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांनी येथे जोरदार हंगामा केला आहे. या प्रकरणात मराठी असल्यामुळे डायमंड असोसिएशनचे सभासत्व सभासत्व न दिल्याने ठाकरे गट आक्रमक होऊन डायमंड असोसिएशनच्या कार्यालयात जाऊन बोर्डाला काळ फासले आहे.
दि मुंबई डायमंड मर्चंट असोसिएशन पंचरत्न गिरगाव ऑपेरा हाऊस या असोसिएशनचे मुंबईत 17 हजार सभासद आहेत. आता नव्याने आठशे जणांना सभासद केले आहे. त्यात एकही मराठी माणसाला सभासद केले नसल्याचे उघडकीस आले आहे. या असोसिएशनच्या काही सभासदांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना केवळ ते मराठी असल्याने सभासत्व देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी शिवसैनिकांनी मंगळवारी गिरगावातील दि मुंबई डायमंड मर्चंट असोसिएशन पंचरत्नच्या कार्यालयात जाऊन जोरदार घोषणाबाजी केली आहे.
दि मुंबई डायमंड मर्चंट असोसिएशन पंचरत्न गिरगाव ऑपेरा हाऊस या असोसिएशनच्या कर्मचाऱ्यांना आता निवडणूका नाहीत असा बचाव केला. त्यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जोरदार हंगामा केला. निवडणूका गेल्या खड्ड्यात आधी मराठी माणसांना सभासद का केले नाही ते सांगा.आणि सभासत्व मिळण्यासाठी नवीन सभासद अर्ज बनवला होता तो सुद्धा इंग्लिश आणि गुजरातीमध्ये बनवला आहे. यामुळे ठाकरे गटाने आक्रमक होत. येथील बोर्डाला काळे फासले आणि मराठी माणसांना सभादत्व न देण्याची हिंमत होतेच कशी असा जाब विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी विचारला आहे.