Menstrual Cycle : मासिक पाळी आहे म्हणून मुलीला झाड लावू दिले नाही त्याच नाशिकमध्ये रंगला मासिक पाळी महोत्सव

| Updated on: Aug 05, 2022 | 3:41 PM

मासिक पाळी.... महिलांनाच मिळालेलं एक वरदान... आजही समाजात मासिक धर्माबाबत बोललं जात नाही... इतकंच काय तर नागरिकांच्या मनात पूर्वग्रह आणि चुकीच्या समजुती आहेत.  खरंतर हा शारीरधर्म विज्ञानाधारित आहे. त्याच दृष्टीकोनातून त्याकडे बघायला हवे. मात्र आजही अंधश्रद्धांमुळे समाज काही प्रमाणात बुरसटलेलाच दिसतोय आणि याच विषयाची जनजागृती व्हावी यासाठी नाशिकमध्ये एका पित्याने पुढाकार घेतलाय.

Menstrual Cycle : मासिक पाळी आहे म्हणून मुलीला झाड लावू दिले नाही त्याच नाशिकमध्ये रंगला मासिक पाळी महोत्सव
Follow us on

नाशिक : मासिक पाळी(Menstrual cycle) आहे म्हणून एका मुलीला झाड लावू न दिल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली होती. या घटनेवरुन चांगलात वादंग उडाला होता. त्याच नाशिकमध्ये मासिक पाळी महोत्सव(menstruation festival ) रंगला होता. विशेष म्हणजे एका पित्यानेच हा महोत्सव आयोजीत केला होता. या महोत्सवाची नाशिकमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. महिलांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी उपस्थिती दर्शवली होती.

मासिक पाळी…. महिलांनाच मिळालेलं एक वरदान… आजही समाजात मासिक धर्माबाबत बोललं जात नाही… इतकंच काय तर नागरिकांच्या मनात पूर्वग्रह आणि चुकीच्या समजुती आहेत.  खरंतर हा शारीरधर्म विज्ञानाधारित आहे. त्याच दृष्टीकोनातून त्याकडे बघायला हवे. मात्र आजही अंधश्रद्धांमुळे समाज काही प्रमाणात बुरसटलेलाच दिसतोय आणि याच विषयाची जनजागृती व्हावी यासाठी नाशिकमध्ये एका पित्याने पुढाकार घेतलाय.

कृष्णा चांदगुडे या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या मुलीला आलेल्या पाळीचा महोत्सव साजरा करण्याचे ठरविल होतं. आणि नाशिककरांच्या उपस्थित जनजागृती करत हा मासिक पाळी महोत्सव पार पडलाय.

नुकत्याच नाशिकच्या एका आदिवासी आश्रमशाळेत एका विद्यार्थिनीला मासिक पाळीत झाडं लावू दिलं नाही म्हणून राज्यभरात चर्चिला गेलेला विषय पाहून मासिक पाळीची जनजागृती व्हावी आणि याची सुरुवात घरातूनच व्हावी यासाठी चांदगुडे यांनी हा पुढाकार घेतलाय.

आता माझी पाळी… मीच देते टाळी असं म्हणत पार पडलेला मासिक पाळी महोत्सव मोठ्या प्रमाणात व्हायला हवेत असं सहभागी झालेल्या महिलानी म्हटलंय. मासिक पाळीची सुरुवात म्हणजे मुलीची तारुण्यावस्थेत पदार्पण होणे याची प्रक्रिया सामाजात जनजगृती होण्याची गरजही व्यक्त केली जातेय.

खरं म्हणजे मासिक पाळीच्या बाबतीत आजही समाजातील विचार हा बुरसटलेलेच आहेत. वेगवेगळे संदर्भ देऊन आजही मासिक पाळीच्या बाबतीत गैरसमज आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये पार पडलेला हा महोत्सव जगभर आणि व्यापक स्वरूपात व्हायला हवा हीच काय ती अपेक्षा.

मासिक पाळी म्हणजे नक्की काय?

मासिक पाळी म्हणजे गर्भधारणा न झाल्यामुळे शरीरातून बाहेर टाकली जाणारी अंतरत्वचा. गर्भधारणा झाली नाही तर महिन्याला 4-5 दिवस ही क्रिया घडते, त्याला आपण मासिक पाळी म्हणतो. मासिक पाळीची सुरुवात सर्वसाधारणपणे 12-13 व्या वर्षी होते. स्त्रियांच्या रजोनिवृत्तीपर्यंत किंवा मोनोपॉजपर्यंत म्हणजेच 45-50 या वयापर्यंत हे चक्र सुरु असते.

मासिक पाळी आणि संसर्ग

खेडगावात किंवा ग्रामीण भागात महिला मासिक पाळीदरम्यान खराब कापड, प्लास्टिक, भुसा किंवा चक्क राखेचा वापर करतात. मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन वापरावे, यामुळे संसर्ग रोखता येतो असे अनेकदा सांगितले जाते. मात्र तरीही देशातील केवळ 30 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात.

मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या खराब कपड्यांमुळे महिलांना योनीमार्गाचे संक्रमण, मूत्राशयाचा किंवा गर्भाशयाचा संसर्ग होतो. विशेष म्हणजे यामुळे महिलांच्या गर्भधारणेत अनेक अडचणी येतात.