स्नॅपचॅट वापरत असाल तर सावधान! नाशिकच्या विद्यार्थ्याने स्नॅपचॅटबद्दल केलं संशोधन

| Updated on: Nov 03, 2022 | 8:06 PM

नाशिकमधील सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल सटले याने हा स्नॅपचॅटमधील बग शोधला आहे.

स्नॅपचॅट वापरत असाल तर सावधान! नाशिकच्या विद्यार्थ्याने स्नॅपचॅटबद्दल केलं संशोधन
Image Credit source: Social Media
Follow us on

नाशिक : तुम्ही स्नॅपचॅट वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण स्नॅपचॅटमध्ये एक बग असल्याचे संशोधन नाशिकच्या एका विद्यार्थ्याने लावले आहे. सोशल माध्यमांमध्ये फोटो काढण्यासाठी आणि शेयर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे स्नॅपचॅट हे तरुणाईच्या विशेष पसंतीस उतरले आहे. पणयामध्ये एक बग सापडला असल्याने स्नॅपचॅटची सुरक्षितता धोक्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे विशाल सटले या विद्यार्थ्याने स्नॅपचॅटच्या माय आईज ओन्ली या फीचर हा बग आढळून आला आहे. या संशोधनाबाबत स्नॅपचॅटचा स्वीकृती दर्शक ई-मेल देखील या विद्यार्थ्याला मिळाला आहे. याबाबत स्नॅपचॅटचे मालक याबाबत निर्णय घेऊन मार्ग काढू शकतील पण एका विद्यार्थाला हा बग आढळून आल्याने त्याचे कौतुक केले जात असून स्नॅपचॅट सुरक्षित आहे की नाही ? याची चर्चा सुरू झाली आहे.

नाशिकमधील सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल सटले याने हा स्नॅपचॅटमधील बग शोधला आहे.

खरंतर तरुणाईमध्ये लोकप्रिय म्हणून स्नॅपचॅटची ओळख आहे. अनेक जण त्याचा वापर करून फोटो शेयर करत असतात.

हे सुद्धा वाचा

खरंतर याच काळात स्नॅपचॅट वापरतांना त्याचा खाजगीपणा आणि सुरक्षितता जपली जायला हवी होती.

मात्र, तंत्रज्ञान विकसित होत असतांना स्नॅपचॅटने देखील अद्यावयत करणे आवश्यक होते, मात्र तसे न झाल्याने त्यामध्ये बग सापडला आहे.

या फीचरमध्ये विशाल सटले यांनी बग शोधला असून हॅकरला ही माहिती स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सेव्ह करता येऊ शकते असा निष्कर्ष काढला आहे.

वापरकर्त्याला हे समजणारच नसल्यामुळे या फिचरला देण्यात आलेली प्रायव्हसी ब्रेक होत असून सोशल माध्यम आणि सुरक्षितता हा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे.

स्नॅपचॅट हे एक प्रकारचे मेसेंजर ॲप असून सध्या लोकप्रिय आहे. त्यातून युजर्स एकमेकांना फोटो व्हिडिओ हे आपल्या पाठवत असतात.