औरंगाबाद: कोरोना विषाणूची लागण (Coronavirus) झालेल्या राज्यातील बड्या नेत्यांमध्ये आता औरंगाबादचे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel ) यांची भर पडली आहे. इम्तियाज जलील यांनी ट्विटवरुन ही माहिती दिली आहे. (MIM Aurangabad MP imtiaz jaleel infected with coronavirus)
गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज जलील यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे जलील यांनी कोरोना चाचणी करवून घेतली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता इम्तियाज जलील यांनी स्वत:ला आयसोलेट करुन घेतले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे सरकारमधील अनेक बड्या नेत्यांना कोरोनची लागण झाली आहे. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बच्चू कडू, एकनाथ खडसे, राजेंद्र शिंगणे यांचा समावेश आहे.
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा सोमवारी काहीसा कमी आल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सोमवारी कोरोनाचे 5 हजार 210 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 5 हजार 35 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर 18 कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 19 लाख 99 हजार 982 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 94.96 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा 2.46 टक्क्यांवर आहे.
संबंधित बातम्या:
नागपुरातील मंगल कार्यालयात 8 लोकं कोरोनाग्रस्त, हॉलला पोलिसांनी ठोकलं टाळं, कन्टेन्मेट झोन घोषित
(MIM Aurangabad MP imtiaz jaleel infected with coronavirus)