औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून अमरावती शहर हिंचाराच्या घटनांनी धुमसत आहे. शहरातील अशांतता तसेच हिंचाराला रझा अकादमी जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय. याच आरोपाबद्दल एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना विचारण्यात आलं. मात्र त्यांनी अमरावतीतील हिंचाराला जबाबदार कोण या प्रश्नाचा थेट उत्तर देण्याचे टाळले. त्यांनी बोलणे टाळून दंगलीचा निषेध केला. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
त्रिपुरा येथील कथित घटनेचे पडसाद राज्यातील काही शहरांत उमटले. यामध्ये अमरावती शहरामध्ये मुस्लीम समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर होता. त्यानंतर भाजपने दुसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या बंदला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. अमरावतीत संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर या हिंसाचाराला नेमंक जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. तर रझा अकादमीच या हिंसाचाराला जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसी यांना विचारण्यात आले. मात्र त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देणा टाळले. “या दंगलीचा मी निषेध करतो. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करू नका. मला त्यावर बोलायचं नाही.”अशी प्रतिक्रिया ओवैसी यांनी दिली.
अमरावती शहरात उसळलेल्या हिंसाचाला रझा अकादमी जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेते तथा आमदार प्रविण पोटे यांनी केला होता. “आम्ही शांततेत बंद पुकारला होता. मात्र, त्यात रझा अकादमीचे लोक शिरले आणि सगळा हिंसाचार घडला. हिंदूंवर हल्ला करण्याचा प्रय़त्न केला गेला. त्याला उत्तर देण्यासाठी बंद पुकारला होता, मात्र हिंसाचार घडला. अमरावती शहरात संचारबंदी लावण्यात महाविकास आघाडी सरकारचा हात आहे. हिंदू-मुस्लीम या ठिकाणी काम करतात. संचारबंदीमुळे त्यांचं नुकसान होत आहे. संचारबंदी हटवावी यासाठी जामीन मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तांशी बोलणार आहे.संचारबंदीमुळे विद्यार्थ्यांचंही मोठं नुकसान होतं,” असं पोटे 17 नोव्हेंबर रोजी म्हणाले होते.
त्रिपुरा येथील कथित हिंसाचार प्रकरणी अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी मुस्लिम समाजानं बंदचं आवाहन केलं होतं. मात्र यावेळी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या जमावानं दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. या घटनेचा निषेध म्हणून 13 नोव्हेंबर रोजी भाजपने बंदचं आवाहन केलं होतं. या दिवशीही मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरून त्यांनीदेखील हिंसक कारवाया केल्या. तेव्हापासून अमरावती शहरात तणावपूर्ण शांतता असून चार ते पाच हजार पोलीस सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात आहेत. अमरावतीत दंगा नियंत्रक पथकही तैनात ठेवण्यात आले आहे.
इतर बातम्या :
VIDEO: समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे तीन गंभीर आरोप; नव्या आरोपांनी खळबळ
25 कोटीच्या डीलवर वानखेडेंची 4 तास चौकशी, पण आरोप करणारेच ‘बेपत्ता’, एनसीबीचं मीडियाद्वारे समन्स
बनावट प्रमाणपत्रे दावून वानखेडेंनी नोकरी बळकावली, भीम आर्मीची जात पडताळणी समितीकडे तक्रार