नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मिनी बस उलटल्याचे समोर आले आहे. मिनी बस च्या अपघातात 13 प्रवासी जखमी झाले आहे. त्यामध्ये 29 प्रवासी होते. जे जखमी झाले होते त्यांच्यासह इतरांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. यामध्ये जखमीवर उपचार सुरू करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर येथील दर्शन आटपून ते ब्रम्हगिरी पर्वतावर गेले होते तेथूनही परतत असतांना गंगाद्वारे जाणाऱ्या उताऱ्यावर हा अपघात घडला आहे. बस उलटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या ग्रामीण हद्दीत ही घटना घडली असली तरी या घटनेची सर्वत्र माहिती वाऱ्यासारखी पसरली आहे. हे सर्व भाविक बुलढाणा येथून नाशिकला दर्शनासाठी आले होते. त्याच दरम्यान हा अपघात घडला आहे. यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हाणी झालेली नाही.
नाशिक शहरासह जिल्ह्यात कुठे ना कुठे एका बसचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. सरासरी अंदाज बघता आठवड्यात एकतरी अपघात समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव घेण्याबरोबरच पर्यटन आणि दर्शन असा एकत्रित दौरा नागरिक करत आहे.
पर्यटकांची वाढलेली संख्या बघता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर रस्त्यावर मोठी वर्दळ आहे. अशातच एका मिनी बस उलटून अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
बुलढाणा येथून आलेल्या बसचा गंगाद्वार येथे उताराला बस उलटल्याची माहिती समोर आली आहे. पर्यटन केंद्र येथे हा अपघात घडला आहे.
बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यात 13 जण जखमी झाले आहेत.
दर्शनासाठी आलेले सर्व भाविक हे बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावचे रहिवासी आहेत, त्र्यंबकेश्वर येथे आज दुपारच्या वेळी देवदर्शनासाठी आले होते.