नाशिक : शिवभोजनथाळी बाबत नागरिकांकडून चवीबाबत नाराजी व्यक्त केली जात असतांना नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वतः अचानक शिवभोजन थाळीच्या केंद्रावर भेट दिली आहे. यावेळी स्वतः पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वतः शिवभोजन थाळीची चव चाखली आहे. यावर दादा भुसे यांनी चवीवरुन नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपून पालकमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी मुंबईनाका परिसरातील शिवथाळी केंद्राला अचानक भेट दिली. जेवणाची चव चाखल्यानंतर अन्नपदार्थांच्या दर्जात सुधारणा करा, अशा सूचना देत असतांनाच लाभार्थी यांचा तपशील ठेवला जात नसल्याचं आढळून आले आहे. खरंतर सत्तांतर झाल्यानंतर शिवभोजन थाळी सुरू राहील की नाही अशी शक्यता वर्तविली जात असतांना शिवभोजन थाळी सुरूच राहील असं स्पष्ट करण्यात आले होते.
शिवभोजन थाळी सुरू राहील अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली होती, त्यामुळे शिवभोजन थाळी केंद्र चालक यांना मोठा दिलासा मिळाला होता.
महाविकास आघाडी सरकारने ही शिवभोजन थाळी सुरू केली होती, त्यामुळे गरोगरीब, कष्टकरी यांना याचा मोठा दिलासा मिळाला होता, कोरोना काळात या थाळीची मोठी मदत झाली होती.
दरम्यान, शिवभोजन थाळी हा उपक्रम चांगला असला तरी शिवभोजन थाळीच्या चवीवर नाराजी व्यक्त केली जात आहे, तक्रारी प्राप्त झाल्याने स्वतः पालकमंत्री दादा भुसे यांनी पाहणी केली आहे.
यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी चवीवर नाराजी व्यक्त केली असून लाभार्थी यांचे रेकॉर्ड ठेवले जात नाही अशी बाब आढळून आली असून त्यावर देखील भुसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शिवभोजन थाळीच्या केंद्रावर अचानक भेट देऊन दादा भुसे यांनी एकप्रकारे इशारा दिला आहे, त्यातच येणाऱ्या काळात शिवभोजन थाळीच्या चवीत सुधारणा झाली नाही तर कारवाई केली जाईल अशीही भूमिका भुसे यांनी घेतली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या खात्याच्या कारभार होता, त्यामुळे त्यांच्याच जिल्ह्यात शिवभोजन थाळीच्या चवीवर नाराजी व्यक्त केल्याने चर्चा होऊ लागली आहे.