मुंबई : अनंत करमुसे मारहाण प्रकरणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक (Jitendra Awhad Arrested) करुन जामिनावर सोडण्यात आलं. कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. अनंत करमुसे या व्यक्तीचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच गुन्ह्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. ठाणे पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिलीय.
At Last Thackeray Sarkar’s Minister Jitendra Awhad arrested on Anant Karmuse kidnapping & assault case.
अखेर ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली.@BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 14, 2021
जिंतेद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलं होतं. तसेच अटक करुन ठाणे पोलिसांनी आव्हाड यांना कोर्टासमोरदेखील हजर केलं होतं. या प्रकरणात कोर्टाने त्यांना तत्काळ जमीनदेखील दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती.
जितेंद्र आव्हाड यांची अटक आणि जामीन ही घडामोड माहीत झाल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी तसेच आव्हाड यांना लक्ष्य केल. अनंत करमुसे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं. त्यांना कशाप्रकारे मारहाण करण्यात आली ये सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत होती. मात्र, त्यांचच सरकार असल्यामुळे त्यांच्याविरोधात काहीही कारवाई झाली नसेल. मात्र आता कोर्टाच्या काही अडचणी अल्या असतील. तसेच इतर संभाव्य अडचणी आल्या असतील त्यामुळे ऑनरेकॉर्ड अटक दाखवली असेल. पण सरकार यांचच असल्याेमुळे जामिनाची व्यवस्था करुन ठेवली असेल, असा दावा प्रविण दरेकर यांनी केला.
जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी (Jitendra Awhad comment on Assaulting a Person) आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर तरुणाने केला केला होता. फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने या तरुणाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला होता. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा त्या तरुणाने केला होता. नंतर या प्रकरणाचे मोठे राजकीय पडसाद उमटले होते. याच प्रकरणात आव्हाड यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला आहे.
इतर बातम्या :
क्या हुआ तेरा वादा? पुण्यात राष्ट्रवादी भाजपला वायद्यांची आठवण करुन देणार
Sameer Wankhede | मोठी बातमी ! समीर वानखेडेंना मुंबई पोलिसांचं समन्स, हेरगिरीप्रकरणात चौकशी होणार
Aryan Khan Bail | आर्यन खानचा मुक्काम कोठडीतच ! न्यायालयाने निकाल राखून ठेवला, 20 ऑक्टोबरला निर्णय