कोल्हापूर : मंत्र्याची गाडी वाहतूककोंडीत अडकल्याने एका पोलिसाने चक्क वाहनचालकालाच चापट लगावल्याचा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला. अचानक आव्हाड यांचा ताफा आल्यामुळे वाहतूक कोंडीतून वाट करून देताना पोलिसांची दमछाक झाली होती. यावेळी एका पोलीस हवालदाराने एका वाहनधारकाला चक्क चापट लगावली. जितेंद्र आव्हाड काल कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. कोल्हापूरच्या भाऊंसिंगजी रोडवर जितेंद्र आव्हाड यांचा ताफ पोहोचला त्यावेळी ही घटना घडली. आव्हाडांचा ताफा जात असताना अचानक एका चौकात वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली होती. मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा ताफा थांबल्यामुळे पोलिसांची अडकलेल्या गाड्यांना बाजूला हटवण्यासाठी एकच धावपळ उडाली.
आव्हाड यांच्या ताफ्याला रस्ता मोकळा करून देताना एका पोलिसाने वाहनधरकावरच आपला राग काढला. जितेंद्र आव्हाड हे अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते. मात्र वाहतूककोंडी प्रचंड झाली होती. त्यातून रस्ता मोकळा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. हे करत असताना पोलिसांची दमछाक होत होती. त्यामुळे संतप्त झलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने थेट एका जीप चालकाच्या हातावर चापट मारली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
#Kolhapur : मंत्र्याची गाडी वाहतूककोंडीत अडकली अन् वाहतूक पोलिसांनं वाहनधारकाला चापट लगावली…
पाहा व्हिडिओ – @Awhadspeaks #kolhapurpolice #Traffic
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/oNbCBQ3Bv0— TV9 Marathi (@TV9Marathi) May 30, 2022
जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेनेचे नेते संजय राऊत हेदेखील काल कोल्हापुरात होते. या दोन्ही नेत्यांची भेटही काल झाली. आमचे ठरले आहे, असे हातात हात देत संदेशही त्यांनी दिला होता. संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांची कोल्हापूर शासकीय विश्रामगृहाच्या आवारात ही भेट झाली होती. या भेटीवेळी दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केले, मात्र त्यानंतर जितेंद्र आव्हाड हे संजय राऊत यांचा हात उंचावत म्हणाले आमचे ठरले आहे, आमचे ठरले आहे. त्यामुळे यांचे नेमके काय ठरले आहे? अशा चर्चा राजकारणात सुरू झाल्या. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने संजय राऊत कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी शाहू छत्रपतींची भेटही घेतली होती. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाडही कोल्हापुरात त्यांच्या कामानिमित्त आले होते. दोघांचीही समोरासमोर भेट झाल्याने नंतर याविषयी चर्चादेखील ऐकायला मिळाली होती.