मुंबई : सत्तेत असताना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी दिली होती. यावरुन राज्यात राजकीय झिंगाट सुरू झाले होते. भाजपा महाविकास आघाडी सरकाला चांगलेच धारेवर धरले होते. यानंतर नव्याने सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार मॉलमध्ये वाईन विक्री करण्याबाबतचे धोरण राबवणार आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (shabhuraj desai) यांनी मॉलमध्ये वाईन विक्री(sale of wine in malls) करण्याच्या धोरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आता सतत्ते आल्यानंतर टीका करणारा भाजप काय निर्णयाबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात जनरल स्टोर्स किंवा मॉलमध्ये वाईनविक्रीचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.
मॉलमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयासंदर्भात लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. अनेकांनी आपली मतं मांडली आहेत. या सर्व मतांचा विचार करुन ड्राफ्ट तयार केला जाणार आहे.
जनतेच्या मताचा विचार करुन मॉलमध्ये वाईन विक्री करण्याबाबत धोरण तयार करण्यात येणार आहे. हा वाईन विक्रिच्या धोरणाचा ड्राफ्ट घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे देसाई यांनी सांगीतले आहे.
या ड्राफ्टबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस शेतकरी हिताचा निर्णय घेतील अशा विश्वासही शंभूराज देसाई व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं हे नवं सरकार आहे यामुळे या वाईन विक्रीतून शेतकऱ्यांना फायदा होणार असेल तर हा निर्णय स्वागतार्ह ठरेल असेही शंभूराज देसाई म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला तेव्हा या मागची सर्व माहिती तसेच यामुळे होणारा फायदा नीटपणे पटवून देता आला नव्हता. यामुळेच विरोध झाला होता. मात्र, आता हा निर्णय योग्यरीत्या मांडणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगीतले.
राज्यातील सुपर मार्केट, किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय तत्कालीन ठाकरे सरकारने घेतला होता. महाविकास आघाडीचा वाईन विक्रीचा निर्णय योग्यच अससल्याचते म्हणत राष्ट्रवादीचे सर्वसर्वे शरद पवार यांनी या निर्णयाची पाठराखण केली होती. मात्र, भाजपने या निर्णयाला विरोध केला होता.