मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसी आरक्षण (OBC Reservation) रद्द झाल्यानंतर राज्यातलं राजकारण ढवळून निघत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि विरोधकांमध्ये सातत्यानं ओबीसी आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत असतात. अशात मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावरून भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसी आरक्षण रद्द झालं हे भाजपचंच पाप असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे. (Minister Vijay Vadettiwar has strongly criticized the BJP over OBC reservation.) भाजपानं नीट भूमिका मांडली असती तर ओबीसींवर ही वेळ आली नसती असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी काम करत असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारमधले तीनही पक्ष ओबीसी आरक्षणासाठी काम करत आहेत. राज्य सरकारमार्फत आम्ही ओबीसींचा डेटा मिळवू आणि ओबीसी आरक्षण मिळवून देऊ असा विश्वास वडेट्टीवारांनी व्यक्त केला.
दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पुरग्रस्तांसाठी राज्य सरकारने मदत, दुरूस्ती आणि दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजवरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली. या टीकेला वडेट्टीवार यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. ”विरोधक त्यांची भूमिका पार पाडत आहेत. पण त्यांनी जाहीर केलेलं पॅकेज आम्हालाही माहिती आहे. आपत्तीग्रस्तांसाठी रस्ते, वीज, या मूलभूत गोष्टींसाठी निधी दिला पाहिजे. त्या सर्वांचा या पॅकेजमध्ये समावेश आहे आणि राज्य सरकारनं एक सर्वसमावेशक पॅकेज जाहीर केलं आहे,” असं विजय वडेट्टीवारांनी सांगितलं आहे. (Minister Vijay Vadettiwar has strongly criticized the BJP over OBC reservation.)
संबंधित बातम्या :
तर घरोघरी जाऊन ओबीसींचा इम्पिरीकल डाटा गोळा करावा लागेल: विजय वडेट्टीवार