मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर ते जेलच्या बाहेर आले आहे. त्यावर ठाकरे गटासह राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस आणि इतर पक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांना आज सर्वाधिक आनंद झाला आहे पण त्याचे निमित्त वेगळं आहे. संजय राऊत यांच्या जामीनावर प्रतिक्रिया देत असतांना बच्चू कडू म्हणाले 20 ते 25 वर्षापासून ज्याची प्रतीक्षा होती तो निर्णय आज झाला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय झाला असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे. खरंतर बच्चू कडू यांच्यासाठी खास कॅबिनेट खातं तयार केलं जाईल अशी माहिती स्वतः त्यांनीच दिली होती. त्यावर आज निर्णय झाला आहे. शिंदे गटात गेलेले बच्चू कडू यांच्यासाठी देशातील पाहिलं दिव्यांग मंत्रालय उभं केलं जाणार आहे. 3 डिसेंबरला याची घोषणा केली जाणार असल्याची माहिती देखील बच्चू कडू यांनी दिली आहे.
देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय हे महाराष्ट्रात सुरू केलं जाणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून पुढील मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार असून दिव्यांग यांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभं केलं जाणार आहे.
दिव्यांग मंत्रालय उभारले जात असतांना त्याची खास भरती देखील केली जाणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
20 ते 25 वर्षापासून ही लढाई सुरू होती, त्यातील पहिल्याच बैठकीला याबाबत निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली असल्याचे कडू यांनी म्हंटले आहे.
संजय राऊत यांना खरंतर आज जामीन देण्यात आला आहे, त्यावर कडू यांनी उत्तर देतांना राऊत यांना जामीन मिळाला तर त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा आनंद झाला आहे तसा आम्हाला झाला आहे पण त्याचे कारण आहे दिव्यांग मंत्रालय.
खरंतर बच्चू कडू नाराज आहेत का ? अशी चर्चा सुरू असतांना त्यांना दिव्यांग मंत्रालय निर्माण करून त्याचे मंत्री केलं जाणार असल्याची माहिती कडू यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
मात्र संजय राऊत यांना जामीन मिळाला यावर स्पष्टपणे प्रतिक्रिया न देता कडू यांनी गुगली टाकत दिव्यांग मंत्रालय हाच आमचा आनंद असल्याचे म्हंटले आहे.