Video | माझी पेंशन मी सरकारला देणार, शिंदे गटाच्या आमदाराची घोषणा

| Updated on: Mar 15, 2023 | 1:47 PM

जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी आमदारांच्या पेंशनची गरज असेल तर ती आम्ही देऊ शकतो. याने प्रश्न सुटणार असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत, असं वक्तव्य आमदाराने केलंय.

Video | माझी पेंशन मी सरकारला देणार, शिंदे गटाच्या आमदाराची घोषणा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गिरीश गायकवाड,  मुंबई | राज्यात जुनी पेंशन योजना (Old Pension Scheme)  लागू व्हावी, या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांनी (Employee) बेमुदत संपाचं अस्त्र उगारलंय. तर सरकारच्या तिजोरीवर भार येत असेल तर आमदार-खासदारांच्या पेंशन बंद करा, अशी मागणीही जोर धरू लागलीय. आमदार बच्चू कडू यांनीही आमदार-खासादारांना कशाला हवीय पेंशन, असा मुद्दा उचलला. आता शिंदे गटाच्या आमदारानेही याला संमती दिली आहे. आमची पेंशन दिल्याने राज्याच्या तिजोरीवरील भार हलका होणार असेल तर आमची पेंशन खुशाल घेतली जावी, अशी भूमिका शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मांडली आहे. मी स्वतः माझी पेंशन द्यायला तयार आहे, असं क्तव्यदेखील त्यांनी केलंय.

काय म्हणाले भरत गोगावले?

आम्ही दोन्ही सभागृहाचे आमदार रिटायर्ड झाल्यावर पेंशन येते. आमदार म्हणून आम्हाला मतदारसंघात फिरावं लागतात. रिटायर्ड झाल्यावर आम्ही काय काम करतो, याची कल्पना सर्वांना आहे. पण आमची पेंशन बंद केल्याने फरक पडणार असेल तर आम्ही सांगतो शासनाला आमची पेंशन घेऊन टाका. आमची तयारी आहे. आमच्या पेंशनमुळे अडचण येणार असेल आणि सरकारला अडचणी येऊ नयेत…

संजय राऊतला जनता कंटाळली

संजय राऊत यांनी शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणावरून शिंदे गटावर गंभीर टीका केली आहे. त्यावर भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, ‘ जर त्यांनी नवीन काही शोधून काढलं नाही तर लोकं कंटाळतात. संजय राऊतचा मुका घ्यायचा का काय ते जनता ठरवणार आहे. नेहमी भडक विधान करायचं अशी संजय राऊत यांची पद्धत आहे. लोकं आता त्यांच्या बोलण्याला कंटाळली आहेत…

आदित्य ठाकरेंना आणखी पुरस्कार मिळाले असते…

आदित्य ठाकरे यांना वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने पहिल्या 100 नेत्यांमध्ये स्थान दिलंय, असा उल्लेख संजय राऊत यांनी केला. त्यावरून भरत गोगावले म्हणाले, ‘ त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. त्यांना शुभेच्छा राहतील. त्यांनी काम करत रहावं. चुकीचं काही करू नये. पूर्वी जर त्यांनी हे केलं असतं आणखी 2-3 अवॉर्ड मिळाले असते. मंत्रिपदाची संधी असते तेव्हा लोकांसाठी कामं करता येतात. वडील मुख्यमंत्री, हे पर्यटन मंत्री अशी फार मोठी संधी होती. पण त्याचं सोनं करता आलं नाही, हेच दुःख असल्याची टीका भरत गोगावले यांनी केली आहे.