राज्याच्या राजकारणाने 2019 नंतर मोठी कूस बदलली. राजकारणातील परंपरागत शत्रू आणि मित्रांची सरळमिसळ झाली. या खिचडीत अनेकांना लॉटरी लागली तर अनेकांना राजकारणातून उठण्याची भीती वाटू लागली. लोकसभेतील बाका प्रसंग अनेकांनी अनुभवला. स्वतःच्या परंपरागत मतदारसंघातील बदलल्या समीकरणांनी राजकारणी अस्वस्थ झाले. आता मित्र कोण आणि शत्रू कोण यांचं गणित मांडण्यात त्यांची शक्ती खर्ची पडायला लागली आहे. पक्ष फोडा-फोडीनंतर राजकीय गणित बदलले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या या बड्या नेत्याने या सर्व बदलल्या परिस्थितीवर मनातील खदखद यापूर्वी पण बोलून दाखवली आहे. संवदेनशील मनाच्या भावना त्यांनी यापूर्वी पण जाहीर केल्या. पण आता त्यांना ही भीती सतावत आहे. कोकणातील या नेत्याने म्हटलंय तरी काय?
भीती वाढली आहे
उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव यांना भीती वाटत आहे. राजकीय हल्ले वाढल्याचे त्यांचे मत आहे. आपल्या वाट्याला अनेक अडचणी येत आहेत. विरोधकांकडून हल्ले होत आहे. मी पण माझं तत्व सोडलं नाही. अशा परिस्थितीत माझं कुटुंब आजपर्यंत एकत्र ठेवण्यात यशस्वी झालो. लोकांचे विचार बदलत चालले आहेत लोक विचाराचा सामना विचाराने करायला तयार नाहीत. वैयक्तिक हल्ले राजकारण्यांवर वाढलेले आहेत. टीकेचा सामना विचाराने करावा हे लोप पावले आहे. मी स्पष्ट बोलतो सिक्युरिटी नाही, अशी भीती भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली.
विरोधकांना संपवण्याची नीती
पण 2014 पासून भारतीय जनता पार्टीचे राजकारण आले. त्यांचा स्तर आणि कार्य पद्धत बघता विरोधकांना संपवण्याची नीती महाराष्ट्रात खेळली जाते आहे. हे सर्व बघता भीती वाटते. वाढत वय वाढत कुटुंब वाढती नातवंडे जबाबदार्या यामुळे भीती यायला लागली ही गोष्ट खरी आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.
गणरायाच्या आगमनाला भजनात दंग
आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं. पारंपारिक पद्धतीने बाप्पांचं आगमन झाले. त्यानंतर ते गणरायांसमोर भजनात तल्लीन झालेले दिसले. त्यांनी अभंग म्हणत मृदंगावर थाप दिली. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. चिपळून तालुक्यातील तुरुंबव गावातील घरी गणपती उत्सवाचा आनंद आहे. त्यांनी आरतीनंतर भजन म्हटले. यापूर्वी त्यांचे भात लावणी करताना पारंपारिक गीत म्हणतानाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आहेत.