सांगलीः भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर सडकून टीका केली जाते. शरद पवार यांनी भाजपविरोधात बोलले तरीही त्यांच्यावर टीका होते आणि नाही बोलले तरीही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांच्याकडून केला जातो. नुकताच देशातील वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधानांना वेगवेगळ्या मुद्यावरून पत्र लिहिले आहे. त्यावर बोलताना भाजपच्या कार्यकाळात लोकशाही धोक्यात आली असल्याची टीका शरद पवार यांनी केली होती.
त्यावर बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की, शरद पवार यांचा जनाधार कमी झाला की, लोकशाही धोक्यात ये हेच यांचे जुने भांडवल असल्याची टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून शरद पवार हे एकटेच अध्यक्ष आहेत आणि आता हे सांगतात लोकशाही धोक्यात येत आहे असे म्हणून त्यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
तर राज्य सरकारचे कौतूक करताना गोपीचंद पडळकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचे कौतूक करत त्यांनी राज्यातील हे सरकार चांगले काम करत असल्याचे म्हटले आहे.
यावर बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यामार्फत राज्यात जनतेच्या हिताचं आणि तेवढ्याच प्रभावीपणे धोरण राबवले जात आहे. त्यामुळे हे सरकार गतिमान सरकार असल्याचेहही त्यांनी सांगितले.
शरद पवार 24 वर्षानंतर देहूला गेले आहेत, आणि तेही तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मग 24 वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांची समाधी नव्हती का ? तुकाराम महाराज नव्हते का असा टोला शरद पवार यांना गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.
शरद पवार हे किती शहाणी आहेत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळे मी त्यांना जास्त गांभीर्याने घेत नसल्याचे सांगत त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शहाण्या माणसाबद्दल बोला असे शरद पवार यांनी वक्तव्य केले होते. त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन करताना हे सरकार जनसामान्यांचे कसे आहे. आणि विरोधकांवर कोणत्याही कुरघोड्या न करता हे सरकार काम करत असल्याचे गौरवोद्गगारही गोपीचंद पडळकर यांनी काढले आहेत.