विधानसभेतील गदारोळावरुन रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना लगावला टोला, रोहित पवार यांचं ट्विट काय ?

| Updated on: Dec 22, 2022 | 2:28 PM

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेच्या गोंधळावरुन सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.

विधानसभेतील गदारोळावरुन रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना लगावला टोला, रोहित पवार यांचं ट्विट काय ?
Image Credit source: Google
Follow us on

नागपूर : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनच्या दरम्यान दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून सभागृहाचे कामकाज अनेक वेळेला तहकूब करण्यात आले आहे. यामध्ये दिशा सालियानच्या मृत्यूची पुन्हा एकदा चौकशी करा अशी मागणी करण्यात आल्याने सभागृहात वारंवार गदारोळ झाल्याचे दिसून आले आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेचे सभागृहात अनेकदा तहकूब करण्याची वेळ आल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षावर ट्विट करत निशाणा साधला आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी सत्ताधारी आमदारच पायऱ्यांवर आंदोलन करताना आणि सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडताना दिसत आहे. हेच का ‘जनसामान्यांचं’ भरकटलेलं दिशाहीन सरकार? सत्ता चालवता येत नसल्याचे विरोधात जाण्याचीच ही त्यांची तयारी दिसतेय! अशा आशयाचे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले असून भाजपसह शिंदे गटाला हा चिमटा काढला आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांना थेट विरोधात जाण्याची तयारी असल्याचा मुद्दा नमूद करत सत्तांतराचा मुद्दा हाती घेतला आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेच्या गोंधळावरुन सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.

रोहित पवार यांनी ट्विटमध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी सत्ताधारी आमदारच पायऱ्यांवर आंदोलन करताना आणि सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडताना दिसत आहे असे नमूद केले आहे.

राज्यातील प्रश्न सोडविण्यापेक्षा दिशा सालियानचा मुद्दा सरकार लावून धरत असल्याने हेच का ‘जनसामान्यांचं’ भरकटलेलं दिशाहीन सरकार? असा टोला लगावला आहे..

सत्ता चालवता येत नसल्याचे विरोधात जाण्याचीच ही त्यांची तयारी दिसतेय! असा चिमटा काढत रोहित पवार यांनी भाजपसह शिंदे गटाच्या आमदारांना टोला लगावला आहे.