छत्रपती संभाजीनगर | 25 नोव्हेंबर 2023 : कॅसिनोचा व्हिडीओ आणि राज्याचा काय संबंध आहे. जरी कॅसिनोमध्ये गेलं तर काय चुकलं ? गोव्यातील हॉटेलमध्ये रशियन मुलींबरोबर हे काय करत होते. प्रचाराच्या नावाने हॉटेलमध्ये जात होते. तुम्ही लंडनमध्ये जाऊन काय हनुमान चालिसा वाचत नाही, यांचे व्हिडीओ बाहेर काढले तर पळता भुई थोडी होईल अशी टिका शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हे 31 डिसेंबरला सरकार पडणार असे आघाडीतील मोठे जाऊ नयेत म्हणून मुद्दामहून पसरवत आहेत. आघाडीतील मोठे नेते 31 डिसेंबरला फुटणार आहेत असा दावाही शिरसाट यांनी केला आहे.
मराठा आरक्षण बाबत मुख्यमंत्री आणि मंत्री एक्टीव्ह आहेत, विधानसभेत आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा होणार का ? यावर मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, मुख्यमंत्र्यांची भूमिका आरक्षणाबाबत अत्यंत स्पष्ट आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिले जाणार असल्याचे आमदार संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे. नेत्यांनी विविध स्टेटमेंट दिल्याने वाद निर्माण होत आहेत. समाजात तेढ निर्माण होईल अशी विधाने करु नयेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विरोधक सत्ता गेल्यानंतर विचलित झाले आहेत. सत्तेत असताना सत्तेचा वापर जनतेसाठी करायचा असतो हे लोक विसरले होते. यांच्या काळात थांबलेली कामे आता एकनाथ शिंदे सरकारच्या काळात सुरु झाली आहेत. विजय वडेट्टीवार यांनी 20 मंत्री एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत अशा आरोप केला आहे. त्यावर विचारता त्यांनी, ‘फायली अडवा आणि फायली जिरवा’ हा प्रयोग आघाडी सरकारमध्ये झाला. आता विजय वडेट्टीवार यांच्या मतदार संघातही कामे होत असल्याचा टोलाही शिरसाट यांनी लगावला आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार अधिवेशनाआधी होणार का ? या प्रश्नावर याबाबत तिन्ही महारथींनाच माहीती असेल, तेच यावर योग्य ते उत्तर देतील असेही शिरसाट यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशन एक पिकनिक म्हणून पाहीले जाते. परंतू हे अधिवेशन आमचे सरकार जनतेच्या मदतीसाठी प्रश्न जाणून घेण्यासाठी घेणार आहे. त्यामुळे कालावधी वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. आघाडीतील मोठे नेते महायुतीत 31 डिसेंबरपर्यंत येतील, कदाचित नव्या वर्षांत येतील अशी माहीती आहे. सगळ्या गोष्टी आताच उघड करीत नाही. परंतू 31 डिसेंबरपर्यंत वाट पाहा असेही शिरसाट यांनी सांगितले.