मुंबई : महाराष्ट्रातील जनतेने 288 आमदारांना निवडून दिले आहे. संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी त्यावर बोलत असतांना 288 आमदार चोर असल्याचं म्हणत आहे. त्यात उद्धव ठाकरे येतात, आदित्य ठाकरे येतात आणि संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊतही येतात. नितेश राणे यांनी जसं सांगितलं की दहा मिनिट सुरक्षा बाजूला ठेवा जनता यांना ठेचल्या शिवाय राहणार नाही. त्यांनी माफी मागून जमणार नाही. त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई झालीच पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे आमदार संतोष बांगर ( santosh bangar ) यांनी म्हंटलं आहे. संतोष बांगर यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी करत असतांना ठाकरे पितापुत्राला टोला लगावला आहे.
संजय राऊत आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतांना संजय राऊत यांनी विधीमंडळ पक्ष चोरमंडळ असल्याचं वादग्रस्त विधान केले होते. एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर भाष्य करत असतांना संजय राऊत यांनी जहरी टीका केली होती.
त्यानंतर भाजपसह शिवसेना पक्षाने संजय राऊत यांच्या या विधानावरुन आक्रमक भूमिका घेत. हक्कभंगाचा ठराव आणण्याची तयारी केली होती. त्यादरम्यान हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर भाष्य केली आहे.
विधानभवनात आणि विधानपरिषदेत दोन्ही सभागृहात संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी केली आहे. विधीमंडळावर संजय राऊत यांनी केलेल्या भाष्यावरून सभागृहात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.
8 मार्चला याबाबत चौकशी करून निर्णय होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर कोणती कारवाई केली जाते. चौकशीला संजय राऊत सामोरे जातात का ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
संजय राऊत यांनी व्हीपच्या मुद्द्यावर बोलत असतांना चाळीस आमदारांवर टीका करत असतांना विधीमंडळ चोर मंडळ म्हंटले आहे. त्यामुळे संपूर्ण सभागृहात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी संजय राऊत यांच्या विधानाचा निषेध केला आहे.
याच दरम्यान निलेश राणे यांनी केलेल्या टीकेचा आधार घेत आमदार संतोष बांगर यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. संजय राऊत यांना सुरक्षा देऊ नका दहा मिनिटे मोकळे सोडा जनता त्यांना ठेचून काढेल असं म्हंटलं आहे.
याशिवाय ज्या विधिमंडळाला चोर म्हंटलं आहे त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि स्वतःचे भाऊ सुनील राऊत आहे असं म्हणत संजय राऊत यांच्या विधानावरून संतोष बांगर यांनी टोला लगावला आहे.