आमदार कांदेंचा भुजबळांना पुन्हा धक्का; झेडपी निवडणुकीच्या तोंडावर नांदगावमध्ये राष्ट्रवादीला सुरूंग

| Updated on: Feb 21, 2022 | 11:33 AM

आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांत स्थानिक गणिते अतिशय महत्त्वाची असतात. त्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेचे कांदे यांनी दिलेला हा मोठा धक्का मानला जातोय. विशेष म्हणजे हे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते भुजबळांच्या समता परिषदेचे माजी अध्यक्ष आणि शिलेदार आहेत. त्याचीच जास्त चर्चा होतेय.

आमदार कांदेंचा भुजबळांना पुन्हा धक्का; झेडपी निवडणुकीच्या तोंडावर नांदगावमध्ये राष्ट्रवादीला सुरूंग
नांंदगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
Follow us on

नाशिकः नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शिवसेना (Shiv Sena) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचे सख्य उभ्या महाराष्ट्राने पाहिले. त्यांनी आमच्यातल्या कुरबुरी कितीही संपल्या-संपल्या म्हणले तरी त्यातून काही ना काही बाहेर निघालेच. आता तर आमदार कांदे यांनी नांदगावमध्ये थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच सुरूंग लावत कार्यकर्त्यांची जोरदार तोडफोड सुरू केलीय. त्यात भुजबळांचे पक्के समर्थक आणि समता परिषदेच्या माजी शहराध्यक्षांना थेट शिवसेनेत प्रवेश घेत जोरदार राजकीय धक्का दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नांदगावमधील राजकीय गणितामध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होऊ शकतात, अशी चर्चा आहे. आता यावर भुजबळांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राजकीय कृतीतून उत्तर?

पालकमंत्री छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकला, असा आरोप यापू्र्वी शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी केला होता. तशी याचिकाच त्यांनी न्यायालयात दाखल केली. ही याचिका मागे घ्यावी म्हणून शिवसेना आपल्याला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचा आरोप केला. हे सारे आरोप भुजबळांनी फेटाळले. मात्र, या प्रकरणात सुहास कांदे यांच्या मागे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत उभे राहिल्याचे महाराष्ट्राने पाहिले. आता त्याचाच पुढचा राजकीय तोडफोडीचा अंक सुरू झाला असून, कांदे यांनी भुजबळांना थेट कृतीतून उत्तर दिल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेत प्रवेशसत्र

कांदे यांच्यामुळे माजी आमदार पंकज भुजबळ यांचे समर्थक व समता परिषदेचे माजी शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. साकोरा येथे जिल्हा परिषद गटातील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी माजी सभापती राजेंद्र चंवर, वेहेळगावचे भावडू गिते, वाल्मिक अहिरे, सुरेश बोरसे, अण्णा सुरसे, निलेश सुरसे, एकनाथ मोरे आणि इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेची वाट धरलीय. आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांत स्थानिक गणिते अतिशय महत्त्वाची असतात. त्या पार्श्वभूमीवर हा राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेचे कांदे यांनी दिलेला हा मोठा धक्का मानला जातोय.

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात