अमरावती : जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील लॉकडाऊन 8 मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, कडक लॉकडाऊन करुनही जिल्ह्यातील कोरोनाचा प्रकोप काही केल्या थांबताना दिसत नाही. अशावेळी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केला आहे.(MLA Sulbha Khodke accuses the administration regarding lockdown)
अमरावतीमध्ये लोकांना आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता लॉकडाऊन करण्यात आल्याचा आरोप आमदार सुलभा खोडके यांनी केला आहे. सध्याच्या स्थितीत लॉकडाऊन हे एकमेव उत्तर नाही तर आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचं खोडके यांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये कडक लॉकडाऊनचे संकेत दिले होते. त्यानंतर 1 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तरीही अमरावती शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
अमरवाती जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात 636 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात 12 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 36 हजार 452 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 29 हजार 848 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केलीय. तर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 533 वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये 6 हजार 71 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
– विवाह सोहळ्यात 50 पेक्षा जास्त नागरिक आढळल्यास मंगल कार्यालय संचालकाला 50 हजार रुपये दंड तसेच आई वडिलांवरवर ही कारवाई होणार. 50 पेक्षा जास्त लोक असल्यास 500रू प्रती नागरिक दंड.
– हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त नागरिक आढळल्यास 25 हजार रुपयांचा दंड.
– हॉटेलची वेळ रात्री 11 वरून 10 करण्यात आली आहे.
– होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांकडून बंध पत्र घेणार कोरोना नियमाचं उल्लंघन केल्यास 25 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
– शहरातील गजबजलेली आणि मुख्य बाजारपेठ समजणारी सक्कर साथ या बाजारपेठेतील दुकाने सायंकाळी 6 वाजताच बंद करण्याचा निर्णय
संबंधित बातम्या :
MLA Sulbha Khodke accuses the administration regarding lockdown