मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. विशेष म्हणजे फक्त राज ठाकरेच नाही तर त्यांच्या आई यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. (MNS chief raj thackeray and his mother tested corona positive)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. कोरोनासदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांच्या आईंनादेखील कोरोनची लागण झाली आहे.
कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाहीमहापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे सक्रिय झालेले आहेत. गेल्या काही काळात त्यांनी पुण्याला मोठ्या प्रमाणात दौरे केलेत. फक्त पुणेच नाही तर नाशिकचाही राज ठाकरेंनी दौरा केलेला आहे. बहुतांश ठिकाणी राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही. विशेष म्हणजे संपूर्ण कोरोनाच्या लाटेतही राज ठाकरेंनी मास्क वापरलेला नाही.
राज ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. असे असले तरी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. तर आता लस घेतललेली असूनदेखील त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच सक्रिय झाले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्या नाशिक, पुणे या शहरांतील दौरे वाढले आहेत. 23 ऑक्टोबर रोजी भांडूपमध्ये मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा स्थगित करण्यात आला आहे. तसेच राज यांचा पुणे दौरादेखील पुढे ढकलण्यात आलाय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता राज यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. पुणे तसेच नाशिक पालिकेत मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. कार्यकर्ता मेळावा, नव्या शाखांची सुरुवात अशा माध्यमातून मनसेकडून पक्षविस्तार करण्यात येत आहे. राज ठाकरेदेखील यामध्ये सक्रिय झालेले आहेत. त्यांनी पुणे तसेच नाशिक आणि मुंबईत वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींकडे लक्ष केंद्रित केलंय. मात्र सध्या त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या सर्व कार्यक्रमाला ब्रेक मिळाला आहे.
इतर बातम्या :
हिंमत असेल तर नाव बदलून दाखवा ! सरकारी परिपत्रकात औरंगाबादचं संभाजीनगर होताच इम्तियाज जलील भडकले
नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट, पाकच्या ड्रग्ज माफियांचे ब्रँड अॅम्बेसेडर; नितेश राणेंचा गंभीर आरोप