लोकसभेला कुणाला मुलाखती द्यायच्या नाहीत ठरवलं होतं. विधानसभेला मुलाखती देणार, त्यामुळे कोणी पत्रकार आले नाही. पाठिंबा दिल्यानंतरची पहिली जाहीरसभा. पाठिंबा का दिला, हे गुढीपाडव्याच्या सभेत सांगितलं होतं. मी सरळ चालणारा आहे. माता भगिनींनी कानात बोटं घालावीत. मध्ये मध्ये आमच्यातील ठाकरे… जनेटिकली प्रॉब्लेम आहे. बैल जसा मुततो तसा विचार नाही करत. एखादी गोष्ट पटली तर पटली. नाही पटली तर शेवटपर्यंत नाही पटणार. 2014 ते 2019 दरम्यान ज्या काही गोष्टी झाल्या. केंद्राने केल्या. त्या नाही पटल्या, मोदींच्या काही गोष्टी आजही पटत नाही. 2019 च्या सभेत जाहीर विरोध केल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
बाबरी मशिदीचा विषय आला. तेव्हा देशभरातून कारसेवक तिकडे गेले. तेव्हा फक्त दुरदर्शन होते. तेव्हा स्लॉट दिले जायचे. जेव्हा कारसेवक गेले. तेव्हा मुलायम सिंह यादवचं सरकार होतं. त्यांनी कारसेवकांना गोळ्या ठारून मारलं होतं. त्यांची प्रेतं शरयू नदीत फेकली होती. ते अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नसल्याचं राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.
मित्राची खरडपट्टी काढताना मागे पुढे पाहू नये. आणि दुश्मनाची स्तुती करताना मागे हटू नये. आज देशात उभी फूट पडली आहे. एक तर मोदींच्या बाजूने किंवा विरोधात असा. त्यावेळी बोललो होतो. विरोधकांना बोलण्याची हिंमत नाही. मला मुख्यमंत्री हवं होतं. मला हे हवं होतं, ते दिलं नाही. म्हणून मी विरोधात. मी तसं केलं नाही. मी भूमिकेच्या विरोधात होतो. काल उद्धव ठाकरे काल आले ना. अडीच अडीच वर्षाचं झेंगाट होतं ना. समजा त्यावेळी भाजपने तुमचे अडीच वर्ष मान्य केले असते. आज जे बोलत आहेत, ते मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर बोलला असता का? असा सवाल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना केला.