Raj Thackrey : शेतकरी पण लाडका आहे हे … राज ठाकरेंची सरकारकडे काय मागणी ?

| Updated on: Sep 04, 2024 | 12:20 PM

Raj Thackrey : सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसंग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावं,असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Raj Thackrey :  शेतकरी पण लाडका आहे हे ... राज ठाकरेंची सरकारकडे काय मागणी  ?
Follow us on

गेल्या दोन महिन्यांत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 1.70 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसानं झालं. आहे. मराठवाडा आणि विदर्भाला या नुकसानीचा सर्वाधिक फटका बसलाय. तर सप्टेबर महिन्याच्या सुरूवातीपासून अतिवृष्टी होत असून त्यामुळे मराठवाड्यात जे नुकसान झालंय त्याची माहिती कृषी विभागाकडून घेण्यात येत आहे. याच मुद्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर काडडून हल्ला चढवत टीका केली आहे. सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसंग आहे हे लक्षात घेऊन सणाच्या काळात नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. X (पूर्वीचं) ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर एक पोस्ट लिहीत राज ठाकरे यांनी ही मागणी केलीये.

काय आहे राज ठाकरे यांची पोस्ट ?

‘गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्यसरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं.’

‘तसंच मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावं. यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते, आणि ती सुकायला वेळ लागतो, यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे ! किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं तेही जनतेला समजेल !’

‘या सगळ्यात सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसांग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावं. ‘ अशी पोस्ट लिहीत राज ठाकरे यांनी सरकारकडे आवाहन केलं आहे.