पुणे : गेल्या काही महिन्यांपासून मनसेचे नेते वसंत मोरे हे नाराज आहे. शहराध्यक्ष पदावरून हटविल्यानंतर वसंत मोरे यांनी पक्षातील कोअर कमिटीच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर मनसेनेते अमित ठाकरे यांनी पुणे येथे येऊन वसंत मोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी भेट घेतली होती. शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर अमित ठाकरे हे कोअर कमिटीसोबत बैठक घेऊन तोडगा काढणार होते. मात्र, त्यानंतर मनसे नेते वसंत मोरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देऊन शहर कार्यालयात पाय ठेवणार नाही अशी भूमिका घेतली होती. ज्या कार्यालयात माझ्या विरोधात कटकारस्थान झाली त्या कार्यालयात मी का जाऊ ? असा सवाल उपस्थित करत वसंत मोरे यांनी आपली नाराजी जाहीर करून टाकली होती. त्यानंतर मनसे सोडण्याचा प्रश्नच येत नाही पण निर्णय आता कोअर कमिटीला घ्यायचा आहे असं सांगून वसंत मोरे यांनी त्यांच्या पक्षातील स्थानाबद्दलचा निर्णय मनसे नेत्यांच्या कोर्टात टाकला होता.
वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त करत घराच्या दिशेने रवाना झाल्यानंतर त्यांनी जुन्या कार्यक्रमातील बॅनर बाहेर काढत त्याचा एक व्हिडिओ बनवून ट्विटरवर शेअर केला आहे.
ज्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वसंत मोरे यांचा फोटो असलेले दोन बॅनर होते. ते बॅनर काढत असतांना वसंत मोरे यांनी दोन्ही बाजूला करत असतांना ते घट्ट चिकटलेले होते.
दोन बॅनर वेगवेगळे करत असतांना वसंत मोरे यांना बराच वेळ लागला होता, याशिवाय त्यांना घामही आल्याचे त्यांनी बोलून दाखविले आहे.
मागच्या महिन्यात एका कार्यक्रमानंतर मांडववाल्याने मा. राजसाहेबांचे आणि माझे मांडवातले २ उभे बॅनर काढले आणि एकमेकांना समोरासमोर बांधले. आज दुपारी अमितसाहेबांना भेटून आल्यानंतर म्हटलं माझ्यावर प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्यांना उत्तर द्यावे म्हणून ते बॅनर शोधून काढले आणि
१/२#मनसे pic.twitter.com/qBNH37xjiX— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) December 9, 2022
या व्हिडिओमध्ये मनसे नेते वसंत मोरे यांनी व्हिडीओ ट्विट करत पक्षातील विरोधकांना डिवचलं, असून त्यांचे आणि राज ठाकरे यांचे नाते कसं घट्ट आहे हे सांगितले आहे.
विशेष म्हणजे रात्री 12:30 वाजता एका बॅनर्सचा व्हिडीओ ट्विट करत वसंत मोरे यांनी विरोधकांवर निशाणा साधत राज ठाकरे आणि त्यांना कोणीही वेगळं करू शकत नाही असं म्हंटलं आहे.
राज ठाकरे आणि माझे नाते कसे आहे हेच या व्हिडीओतुन दाखवण्याचा वसंत मोरेंचा हा प्रयत्न होता, याशिवाय अमित ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरेंनी यांनी हा व्हिडिओ शेअर केल्याने चर्चेला उधाण आले आहे.