इचलकरंजीत इंधन दरवाढ विरोधात मनसे आक्रमक, तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा

| Updated on: Feb 10, 2021 | 4:14 PM

इचलकरंजीत इंधन दरवाढ विरोधात मनसे आक्रमक, तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा (mns protest against petrol, diesel rate hike)

इचलकरंजीत इंधन दरवाढ विरोधात मनसे आक्रमक, तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा
इचलकरंजीत इंधन दरवाढ विरोधात मनसे आक्रमक
Follow us on

इचलकरंजी : वारंवार होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. या दरवाढ विरोधात आज बुधवारी शिरोळ तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने मोर्चा काढत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. शिरोळ तहसिल कार्यालयावर हा मोर्चा काढून दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली. नायब तहसीलदार पी.जी. पाटील यांना निवेदन देण्यात आले. (mns protest against petrol, diesel rate hike)

आधीच कोरोनाच्या संकटामुळे हवालदिल झालेले वाहनधारक भरमसाठ इंधन दरवाढीमुळे मेटाकुटीला आले आहेत. केंद्र सरकारने डिझेल पेट्रोलचे दर कमी करावे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. तसेच ही इंधन दरवाढ कमी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने दिला आहे. यावेळी मनसे वाहतूक जिल्हा संघटक संजय भंडारे, तालुका संघटक अथर्व गाताडे, जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे, अभिनंदन पाटील, निलेश भिसे, सुशांत पाटील, राहुल गोरे, संतोष पाटील, शीतल साळुंखे, विक्रम मडीवाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने याचा थेट परिणाम इंधन दरवाढीवर होताना दिसत आहे. जागतिक पातळीवर इंधनाची मागणी वाढल्याने इंधनाच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे. आज पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रत्येकी 30 पैसे दरवाढ झालेली पहायला मिळाली. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर 94.12 रुपये तर डिझेलचा भाव 84.63 रुपये झाला आहे. (mns protest against petrol, diesel rate hike)

 

चार प्रमुख मेट्रो शहरातील इंधनाचे दर

मुंबई – पेट्रोल 94.12, डिझेल 84.63

दिल्ली – पेट्रोल 87.60, डिझेल 77.73

चेन्नई – पेट्रोल 89.96, डिझेल 82.90

कोलकाता पेट्रोल 88.92, डिझेल 81.31

 

 

इतर बातम्या

आधी लोकसभेत मोदी सरकारवर आसूड, आता पवारांचा ‘खास मोहरा’ राकेश टिकैत यांची भेट घेणार

महाराष्ट्राला 3 लाख 5 हजार कोटी, आरे कारशेडला 1832 कोटी, फडणवीसांकडून ‘सोप्या भाषेत’ अर्थसंकल्प सादर

 

(mns protest against petrol, diesel rate hike)